Illegal Construction  Dainik Gomantak
गोवा

Illegal Construction : महामार्गालगतच्या अवैध बांधकामांवर कारवाई; सरकारने दिला आदेश

...तर अधिकारी जबाबदार

दैनिक गोमन्तक

राष्ट्रीय व राज्याच्या महामार्गाच्या बाजूने असलेल्या सखल जमिनीमध्ये बेकायदेशीरपणे मातीचा भराव घालून बुजवणे तसेच बेकायदेशीर बांधकामांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठीचा आदेश सरकारने काढला आहे.

संबंधित जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी, मामलेतदार व भरारी पथकांना तातडीने कारवाईची विशेष मोहीम सुरू करण्याचे निर्देश देऊन हयगय करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल,असा इशारा दिला आहे.

राज्यात राष्ट्रीय व राज्याच्या महामार्गालगत परवानगीविना भराव टाकून जमिनी बुजवण्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी गोवा भू (बांधकाम प्रतिबंधक)१९५५, भू महसूल कायदा ३३ अन्वये कारवाईचे निर्देश दिले आहेत.

अवैध बांधकाम रोखण्याची गरज

उल्लंघनाची माहिती मामलेदारांनी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिल्यावर त्याविरुद्ध भू महसूल संहितेखाली त्वरित कारवाई सुरू करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. अवैध बांधकाम किंवा मातीचा भराव टाकल्याचे आढळल्यास संबंधिताविरुद्ध ४८ तासात कारवाई करावी. रस्त्यालगत अवैध बांधकाम उभे राहणार नाही, यावर संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवावे, असे आदेशात म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT