Shripad Naik Dainik Gomantak
गोवा

‘रेल्वे दुपदरीकरण विरोधी आंदोलकांबद्दल सहानभूती’ : श्रीपाद नाईक

चांदर येथे रेल्वेच्या दुपदरीकरणास विरोध करणाऱ्या आंदोलकांनी रस्ता काही वेळ अडवला म्हणून कोकण रेल्वेने या आंदोलकांवर खटला दाखल केला आहे. हा खटला मडगावच्या सत्र न्यायालयात चालू असून पुढील महिन्यात त्याची सुनावणी सुरु होणार आहे.

दैनिक गोमन्तक

सासष्टी : चांदर येथे रेल्वेच्या दुपदरीकरणास विरोध करणाऱ्या आंदोलकांनी रस्ता काही वेळ अडवला म्हणून कोकण रेल्वेने या आंदोलकांवर खटला दाखल केला आहे. हा खटला मडगावच्या सत्र न्यायालयात चालू असून पुढील महिन्यात त्याची सुनावणी सुरु होणार आहे. या आंदोलकांबद्दल आपल्याला सहानुभूती आहे,असे केंद्रीय पर्यावरण आणि बंदर राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी सोमवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

मंत्री नाईक म्हणाले की रेल्वेचे दुपदरीकरण हे स्थानिकांना त्रास करण्यासाठी मुळीच नाही. दुपदरीकरणामुळे रेल्वेच्या व गोव्याच्या विकासात भर पडेल. मुरगाव बंदराचा दर्जाही वाढेल. तसेच पर्यावरणाला कसलीही बाधा पोहोचणार नाही या कडे सरकार संपूर्ण लक्ष देईल. आपल्याला या आंदोलकांबद्दल सहानभुती आहे. त्याबद्दल काय योग्य तो मार्ग काढू शकू त्याबद्दल जरुर विचार करू, असेही नाईक म्हणाले.

केंद्र सरकारने अग्नीपथ ही सेनादलात नोकरीसाठी जी नवीन योजना सुरु केली आहे. ती अत्यंत स्तुत्य अशीच आहे. मात्र काही जणांमध्ये गैरसमज झाला आहे. हा गैरसमज दूर करण्यासाठी केंद्र सरकार खुलेपणे चर्चा करण्यास तयार आहे. तसेच सरकार त्यावर काहीतरी निश्‍चितच तोडगा काढेल, असा विश्र्वासही नाईक यांनी व्यक्त केला. हल्लीच सेनादलात भरती होण्यासाठी काही जणांच्या मुलाखती वगैरे झाल्या होत्या. त्यांच्यात हा गैरसमज जास्त प्रमाणात पसरलेला आहे. सरकार त्यातून काहीतरी मार्ग काढेल, असेही नाईक यांनी स्पष्ट केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Temple Festival: शांतादुर्गा वेर्डेकरीण देवस्थानचा कालोत्सव, 28 पासून विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

Gobi Manchurian Ban: डिचोलीत 'गोबी मंचूरियन'वरील बंदी ठरली यशस्वी, 'एफडीए'चा धसका

Goa Tourism: क्रूझ पर्यटन हंगामाला सुरुवात, पहिले जहाज दाखल; 2 हजार पर्यटकांनी घेतले गोवा दर्शन

Goa Agriculture: कृषी लागवडीत 1.927 हेक्‍टरने घट! भात लागवडीचे 10,207 हेक्‍टर क्षेत्र घटले; 11 वर्षांचा तपशील

Tiger Reserve Goa: दोन टप्प्यांत व्याघ्र प्रकल्प साकारा! पाहणीअंती सक्षम समितीची शिफारस; 15 डिसेंबरला सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणी

SCROLL FOR NEXT