Goa Cricket Association Declare Goa T20 Team Dainik Gomantak
गोवा

Goa Cricket: सिद्धार्थकडे यष्टिरक्षणाचीही जबाबदारी; गोव्याचा टी-20 संघ जाहीर

गोव्याच्या संघात समतोल साधण्यावर जास्त भर

किशोर पेटकर

Goa Cricket Association Declare Goa T20 Team: ‘पाहुणा’ क्रिकेटपटू कृष्णमूर्ती सिद्धार्थ गोव्यासाठी आगामी २०२३-२४ मधील देशांतर्गत क्रिकेट मोसमातील झटपट क्रिकेट स्पर्धेत गोव्यासाठी दुहेरी जबाबदारी निभावणार आहे.

प्रमुख फलंदाज या नात्याने त्याच्यावर मदार असेलच, त्याचवेळी संघात समतोल साधण्याच्या उद्देशाने तो टी-२० आणि एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत यष्टिरक्षणही करेल, अशी माहिती गोवा क्रिकेट असोसिएशनचे (जीसीए) सचिव रोहन गावस देसाई यांनी सोमवारी दिली.

मोहीम १६ ऑक्टोबरपासून

यावेळच्या सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत गोव्याचा समावेश ‘क’ गटात आहे. स्पर्धा १६ ते २७ ऑक्टोबर या कालावधीत झारखंडमधील रांची येथे खेळली जाईल. अनुक्रमे आंध्र, मणिपूर, गुजरात, अरुणाचल प्रदेश, रेल्वे, पंजाब, सौराष्ट्र या संघांविरुद्ध गोव्याचे सामने होतील.

संघातील अनुभवी अष्टपैलू दर्शन मिसाळ याच्याकडे नेतृत्व कायम ठेवण्यात आले आहे. १६ सदस्यीय संघ आणि चार राखीव खेळाडू टी-२० स्पर्धेपूर्वी राजस्थानमधील जयपूर येथे सराव करतील आणि तेथून संघ रांची येथे रवाना होईल. त्यासाठी संघाला सोमवारी शुभेच्छा देण्यात आल्या.

संघातील महाराष्ट्राचा ‘पाहुणा’ खेळाडू राहुल त्रिपाठी सध्या चीनमधील हांग् चौऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या पुरुष क्रिकेट संघाचा सदस्य आहे. ती स्पर्धा संपल्यानंतर तो थेट गोव्याच्या संघात दाखल होईल.

गोव्याचा टी-20 संघ

ईशान गडेकर, राहुल त्रिपाठी, कृष्णमूर्ती सिद्धार्थ, सुयश प्रभुदेसाई, दर्शन मिसाळ (कर्णधार), दीपराज गावकर (उपकर्णधार), तुनीष सावकार, मोहित रेडकर, अर्जुन तेंडुलकर, लक्षय गर्ग, शुभम तारी, विकास सिंग, कश्यप बखले, राजशेखर हरिकांत, स्नेहल कवठणकर, फेलिक्स आलेमाव, राखीव: विजेश प्रभुदेसाई, हेरंब परब, शुभम देसाई, कीथ पिंटो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Weather Update: वाळपईत पावसाचे ‘शतक’! 2,552 मिमी पावसाची नोंद, मात्र किनारपट्टी भाग अजूनही कोरडाच

Viral Video: तेलाच्या टँकमध्ये पठ्ठ्यानं मारली डुबकी, तरुणाचा कारनामा पाहून लोकांचा चढला पारा; म्हणाले, ''भावा, जरा तरी लाज बाळग!"

Porvorim Development: पर्वरीचा विकास वेगाने; परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम! फ्लायओव्हरपासून शेती, आरोग्य आणि क्रीडा सुविधांपर्यंत बदलांचा वेध

Parenting Rules For Children: मुलांना ‘नाही’ म्हणण्याची भीती बाळगू नका; आजची छोटी मर्यादा उद्याची मोठी दुर्घटना टाळू शकते!

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

SCROLL FOR NEXT