Crime News Dainik Gomantak
गोवा

Colva Crime : ओडिशातून कामासाठी गोव्यात आला अन् दुसऱ्याच दिवशी संशयास्पद मृत्यू; गळ्यावर ब्लेडचे वार

याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Suspicious death of a Odisha laborer in Colva : गोव्यातील कोलवा येथे ओडिशा येथील व्यक्तीने ब्लेडने स्वत:च्या गळ्यावर वार केल्याची घटना घडली आहे. हा प्रकार 28 जुलै रोजी काल उघडकीस आला. याप्रकाराची माहिती मिळताच कोलवा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून पोलिस पुढील तपास करीत आहेत.

याबाबत कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळ ओडिशा राज्यातील सुंदरगड येथील रहिवासी राम बरला हा शुक्रवारी गोव्यात आला होता. तो कोलवा येथील एका गेस्ट हाऊसमध्ये उतरला होता.

राम याने आपल्या खोलीच्या बाहेर ब्लेडने स्वताचाच गळ्यावर ब्लेडने वार केले. या घटनेची माहिती गेस्ट हाऊसमधील कर्मचाऱ्यांना मिळाली. गंभीर जखमी राम याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्याचे निधन झाले.

मृत राम हा कामगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली असून दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात मृतदेह ठेवण्यात आला आहे.

मृत राम याच्या पत्नीशी पोलिसांनी संपर्क साधून घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली. कोलवा पोलिस निरीक्षक थॅरन डिकॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक दीपा देईकर पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women Reservation Bill 2026: 30 वर्षांची प्रतीक्षा अन् शेवटी निराशाच! लोकसभेत 'महिला आरक्षणा'चं स्वप्न का भंगलं?

Operation Sindoor: घरात घुसून पाकड्यांना ठोकलं! एक वर्षांनंतरही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळात; 'ऑपरेशन सिंदूर'नं मोडलं कंबरडं

Allahabad High Court: "कुटुंबाचा खर्च उचलू शकत नसाल तर लग्नच करु नका!", हायकोर्टाची जळजळीत टिप्पणी; पोटगी नाकारणाऱ्या पतीला मोठा दणका

US Iran War: डोनाल्ड ट्रम्पचा 'डेंजरस' इशारा! इराणचाही चर्चेला नकार आणि युद्धाची ललकारी; घालिबाफ म्हणाले, "धमक्यांनी इराण दबणार नाही!"

SAFF Championship: पाकिस्तानविना गोव्यात रंगणार 'सॅफ फुटबॉल स्पर्धा'; यजमान भारत, गतविजेत्या बांगलादेशसह एकूण सहा महिला संघांत चुरस

SCROLL FOR NEXT