Marra-Pilerne Death Case
Marra-Pilerne Death Case Dainik Gomanta
गोवा

Marra-Pilerne Death Case: मार्रा-पिळर्णमधील व्हिला मालकाचा संशयित मृत्यू! पोलीस तपास सुरू

Kavya Powar

Marra-Pilerne Death Case:

मार्रा-पिळर्ण येथील एका व्हिला मालकाचा संशयित मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पर्वरी पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. श्वानपथकासोबत पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

उपलब्ध माहितीनुसार, मार्रा-पिळर्ण येथे असलेल्या होरीझन्स अझुरा व्हिलाचे (Horizons Azura Villa) मालक निम्स ढिल्लो (77) यांचा काल (3 फेब्रुवारी) रात्री संशयित मृत्यू झाला. व्हिलाचे मालक हे मूळचे पंजाबचे असून इथे ते आपल्या मदतनीसासोबत (Caretaker) राहत असल्याचे सांगण्यात येत आहे.

सदर मालकाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आली नाही. पर्वरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सर्वेश भंडारी या घटनेचा अधिक तपास करत असून पोलीस उपअधीक्षक विश्वेश कर्पे श्वानपथकासोबत घटनास्थळी दाखल झाले आहेत.

दरम्यान, घटनेचा उलगडा होण्यासाठी फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी पोहोचणार आहे. व्हिला मालकाच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली असून ते लवकरच गोव्यात येणार आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Update: लाटंबार्से पंचायतीत सत्ताबदल अटळ; आमदार चंद्रकात शेट्ये यांना मोठा धक्का

Margao: दिगंबर कामतांची चिंता वाढली; मडगावमध्ये सरदेसाईंचा 'जनता दरबार', शेकडो लोकांना मांडल्या समस्या

Goa Assembly Session: ST आरक्षणासाठी युरी आलेमाव अधिवेशनात आवाज उठवणार; 'अस्मिताय दिसा'सह 4 खाजगी ठराव

Goa News: कोलवा PSI ने मारहाण केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणीचा गुन्हा, पतीसह झाली होती अटक

Futsal Goa: गोव्याच्या आंबेली स्पोर्टस क्लबचा गतविजेत्यांना मिनर्व्हा अकादमीला धक्का, उपांत्य फेरीत प्रवेश

SCROLL FOR NEXT