Arrest|Jail|Crime Canva
गोवा

Bicholim Theft: डिचोली चोरीप्रकरणी संशयिताला अटक; अन्य 'मंदिरफोडी प्रकरणांशी' संबंध आहे का याबाबत तपास सुरु

Bicholim Temple Theft: पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३०५ आणि ३३१(४) कलमाखाली गुन्हा नोंद करुन तपास सुरू केला होता

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Theft News

डिचोली: शहरातील श्री शिवलिंग मंदिरातील चोरीप्रकरणी एका संशयित युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. डिचोली शहरातील बंदरवाडा येथे राहणारा आकाश भीमाप्पा तालकेरी (२३) असे त्‍याचे नाव आहे.

गेल्या अडीच महिन्यांत शहरातील अन्य मंदिर फोडण्याच्या प्रकरणात संशयित युवकाचा हात आहे की नाही, त्यादिशेने पोलिस तपास करीत आहेत. गुरुवारी मध्यरात्री शहरातील वृंदावन अपार्टमेंटमधील शिवलिंग मंदिरातील फंडपेटी फोडण्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी देवस्थानचे अध्यक्ष दिगंबर परब यांनी डिचोली पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या ३०५ आणि ३३१(४) कलमाखाली गुन्हा नोंद करुन तपास सुरू केला होता.

मिळालेल्या धाग्यादोऱ्यांच्या आधारे पोलिसांनी कारवाई करुन संशयित युवकाला अटक केली. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक अक्षत कौशल, डिचोलीचे पोलिस उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि पोलिस निरीक्षक दिनेश गडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विराज धावस्कर आणि आकाश परवार यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT