Mapusa Municipal Council Dainik Gomantak
गोवा

Mapusa Municipal Council: म्हापसा पालिका क्षेत्रातील विक्रेत्यांचे सर्वेक्षण; वेंडिंग झोन होणार निश्चित

म्हापसा येथील नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व पथ तसेच इतर विक्रेत्यांची प्रत्यक्षात जागेवर जाऊन सर्वेक्षण केले जाणार असून, विक्रेत्यांसाठी विशिष्ट वेंडिंग झोन निश्चित केली जाईल.

दैनिक गोमन्तक

Mapusa Municipal Council

म्हापसा येथील नगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व पथ तसेच इतर विक्रेत्यांची प्रत्यक्षात जागेवर जाऊन सर्वेक्षण केले जाणार असून, विक्रेत्यांसाठी विशिष्ट वेंडिंग झोन निश्चित केली जाईल. बुधवारी (ता.१४) सायंकाळी मुख्याधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली नव्याने स्थापित झालेल्या टाऊन वेंडिंग कमिटीची (नगर विक्री समिती) बैठक झाली.

या टाऊन वेंडिंग कमिटीचे अध्यक्ष म्हणून म्हापसा पालिकेचे मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर यांना नामानिर्देशित केले आहे. एकूण २७ सदस्यांची ही कमिटी आहे. आजच्या बैठकीस कमिटीवरील सदस्य असलेले नगरसेवक साईनाथ राऊळ, आशीर्वाद खोर्जुवेकर तसेच म्हापसा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीपाद सावंत, सिद्धेश राऊत, असिस कार्दोजो व इतर उपस्थित होते.

मुख्याधिकारी शेटकर यांनी उपस्थितांना टाऊन वेंडिंग कमिटीच्या कामकाजविषयी माहिती दिली. ही कमिटी विक्रेत्यांचे संरक्षण करण्यासोबत त्यांच्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घेईल, असे त्यांनी नमूद केले. त्यानुसार, या टीव्हीसी मार्फत म्हापसा पालिका कार्यक्षेत्रातील सर्व पथ तसेच इतर विक्रेत्यांची सर्वेक्षण केले जाईल. त्यानंतर, वेंडिंग झोन निश्चित करुन मार्केट परिसरात सुसूत्रता व शिस्त आणली जाईल. जेणेकरुन अस्ताव्यस्त बसणार्‍या विक्रेत्यांना एकाच ठिकाणी बसविले जाईल.

त्यानुसार, टीव्हीसी कमिटीअंतर्गत आता उपसमिती स्थापन केली जाणार आहे. यात टीव्हीसीमधील काही प्रतिनिधी तसेच पालिका कर्मचार्‍यांचा समावेश असेल. जे बाजारपेठ तथा पालिका कार्यक्षेत्रातील सर्व विक्रेत्यांचे प्रत्यक्षात सर्वेक्षण करतील. त्याचप्रमाणे, नोंदणीकृत विक्रेत्यांना पालिकेकडून प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाईल.

मुख्याधिकारी चंद्रकांत शेटकर म्हणाले की, विक्रेत्यांसह बाजारमध्ये शिस्त आणण्यासाठी टीव्हीसीची स्थापना केली जाईल. काहीजण जागा घेऊन तिसर्‍या व्यक्तीस व्यवसाय चालविण्यास देतात. मात्र, सर्वेक्षणानंतर कुणालाच नियमांचे उल्लंघन करता येणार नाही. तसेच जो विक्रेता खासगी काम किंवा व्यवसाय करतो, त्याला मार्केटमध्ये विक्रेता म्हणून जागा मिळणार नाही. तसेच सर्वांना समान संधी मिळावी याची खबरदारी टीव्हीसी घेईल. सर्वेक्षणानंतर विक्रेत्यांना ओळखपत्र दिले जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

Horoscope 22 July 2026: कुणाला धनलाभ, तर कुणाला मानसिक ताण! आजचा दिवस ठरणार टर्निंग पॉईंट; 'या' राशींचे चमकणार तारे

SCROLL FOR NEXT