Surla village in Sattari is Goa's Matheran Dainik Gomantak
गोवा

Goa Surla Village : सत्तरीतील सुर्ल गाव म्‍हणजे गोव्‍याचे ‘माथेरान’!

चोहोबाजूला हिरवेगार डोंगर : धबधबे, उंच टेकड्या, निसर्गरम्‍य तलाव; गावाने धरली आहे आधुनिकतेची कास

दैनिक गोमन्तक

सपना सामंत

वाळपई : गावाच्या पश्चिमेला जुना गाव, डौलमांड पठार, शेडीचा पठार यापैकी शेडीच्या पठाराची ख्याती वेगळीच आहे. चारी बाजूंनी दहडी पठार आणि मधोमध लहानशी तळी. ह्या तळीतून सणासुदीला भिंती पांढऱ्या टिपूस रंगाने रंगवायला शेड (रंग) आणली जाते. पर्ये मतदार संघातील ठाणे डोंगुर्ली पंचायत क्षेत्रात येणारा सुर्ल गाव निसर्गसंपन्न व सुंदरतेने नटलेला.

त्याला नैसर्गिक सौंदर्याचे वरदान प्राप्त झालेले आहे. पूर्वीचा गाव व आताचा गाव यात जमीन-आसमानचा फरक आहे. सुर्ल गावातील लोकसंख्या अंदाजे 650च्या आसपास इतकी असून फक्त 100 घरांची व्याप्ती असलेला हा गाव बंधुत्वाच्या धाग्यात एकत्र बांधला गेला आहे.

शेती हा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे इथले लोक नाचणे, भात न वरी या पिकांवर धन्यता मानतात. हा व्यवसाय तेजीत नसल्यामुळे जास्त करून विकत आणूनच चरितार्थ चालविला जातो.

पूर्वी या गावात शिक्षणासाठी, रोजगार उदरनिर्वाहाची काहीच सोय नव्हती. त्यामुळे पणजी, बेळगाव, साखळी तसेच खानापूर या ठिकाणी जावे लागायचे. गावात 1981 साली प्रथम इयत्ता चौथीपर्यंत शाळा सुरू झाली. पुढील शिक्षणासाठी मुलांना शेजारच्या राज्यात जावे लागायचे. तसेच माध्यमिक शाळेसाठी विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर चालत ठाणे येथे जावे लागत असे.

जसे दिवस गेले त्याप्रमाणे गावाचा विकास होत गेला. पूर्वी गावात डॉक्टर नव्हते, दुकाने नव्हती. उपजीविकेची साधने सुर्ल येथे सहजासहजी उपलब्ध नसल्याने गावातील युवकांना नोकरी, कामधंद्यानिमित्त पणजीसारख्या शहराकडे धाव घेणे भाग पडायचे आणि अजूनही पडत आहे.

विकासाची कात टाकतोय गाव

आता सुर्लमार्गे ठाणे येथे यायला पाली जांबळीकडील तीन किलोमीटर रस्ता झाल्याने काही प्रमाणात अंतर कमी झाले आहे. गावात पाणी आहे, वीज आहे. तसेच गेल्या वर्षी जिओ कंपनीची नेटवर्क सेवा सुरू झाल्याने गावाची प्रगती होत आहे. त्याकाळी गावात एकच दूरध्वनी होता आणि तो एकाच्या घरात ठेवण्यात आला होता. हळूहळू दूरध्वनी सेवा आली.

गावाची ओळख ‘रणमाले’

पूर्वी मनोरंजनाचे साधन नव्हते. त्यामुळे गावातील रणमाले हे करमणुकीचे साधन. आता राज्याबरोबर देश पातळीवरही रणमाल्याची कला पोचली आहे. श्री सातेरी केळबाय शांतादुर्गा देवस्थान हे सुर्लवासीयांचे श्रद्धास्थान. गावात वर्षभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात. तसेच जानेवारी महिन्यात देवस्थानच्‍या वर्धापनदिनाला गाव एकत्र येऊन उत्सव साजरा करतात. पूर्वी गावात संपर्काचे साधन नव्हते. डॉक्टर नव्हते. आता सोयीसुविधा उपलब्‍ध होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT