Supreme court Dainik Gomantak
गोवा

Supreme Court on NGT Order : एनजीटीचा निकालच ‘सर्वोच्च’; सरकारची याचिका फेटाळली

लवादाने दिलेल्या आदेशापासून नुकसान भरपाईची रक्कम खाण खात्याने 6 टक्के व्याजासह कुटुंबियांना द्यावी, असे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

Supreme Court on NGT Order : चार वर्षांपूर्वी तुये-पेडणे येथील पाण्याने तुडुंब भरलेल्या चिरेखाणीच्या खंदकात चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी राष्ट्रीय हरित लवादाने खाण व भूगर्भ खात्याला मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 16 लाख रुपये देण्याचा आदेश दिला होता. याला सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले . मात्र, कोर्टाने ही याचिका फेटाळून लवादाचा आदेश कायम ठेवला आहे.

‘मृत्यू पावलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्याचा 13 ऑक्टोबर 2020 रोजीचा एनजीटीचा आदेश हा मानवतावादी दृष्टिकोनातून आहे. त्यामुळे लवादाच्या आदेशात आम्ही हस्तक्षेप करू इच्छित नाही’, असे निरीक्षण सर्वोच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळताना नोंदविले आहे. लवादाने दिलेल्या आदेशापासून ही रक्कम खाण खात्याने 6 टक्के व्याजासह कुटुंबियांना द्यावी. मानवतावादी दृष्टिकोनातून अशाप्रकारचा आदेश देण्याचा लवादाला पूर्ण अधिकार आहे. मोठी झालेली मुले गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांचे दुःख लक्षात घेतल्यास खरोखरच ते भरपाईस हक्कदार आहेत, असे न्यायालयाने म्हटले आहे.

चिरेखाण खंदक न बुजविल्याने घडली घटना

तुये-पेडणे येथील डॉन बॉस्को हायस्कूलचे काही विद्यार्थी शिक्षकांसमवेत सहलीसाठी गेले होते. यावेळी चार विद्यार्थी तेथील पाण्याने भरलेल्या चिरेखाणीच्या खंदकात उतरले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा मृत्यू झाला. चिरेखाणी बंद केल्यानंतर या खंदकांत माती घालून ते न बुजवल्याने ही घटना घडली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT