Sexual Harassment at Work Dainik Gomantak
गोवा

Sexual Harassment: 'SHe-Box' कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाची डिजिटल यंत्रणा

Sexual Harassment at Work: इलेक्ट्रॉनिक बॉक्सच्या माध्यमातून महिला त्यांच्या तक्रारी अगदी सहज नोंदवू शकतात

Akshata Chhatre

पणजी: कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या तक्रारी दाखल करणे सोपे व्हावे यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने "SHe-Box" प्रणाली म्हणजेच एका इलेक्ट्रॉनिक बॉक्सचा समावेश होतो. या इलेक्ट्रॉनिक बॉक्सच्या माध्यमातून महिला त्यांच्या तक्रारी अगदी सहज नोंदवू शकतात.

सर्व सरकारी विभाग, सार्वजनिक क्षेत्रातील युनिट्स आणि खाजगी संस्थांमध्ये तक्रारी समित्या स्थापन झाल्या आहेत याची खात्री करण्याचे निर्देशही न्यायालयाने जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या समित्या लैंगिक छळाच्या तक्रारींची चौकशी आणि निराकरण करण्यासाठी जबाबदार असतील.याव्यतिरिक्त, न्यायालयाने कायदेशीर सेवा संस्थांना महिलांना तक्रारी दाखल करण्यात मदत करण्याचे निर्देश दिले आहेत आणि तक्रारी प्राप्त करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे आणि तक्रारी योग्य समित्यांकडे पाठविण्याचे निर्देश जिल्हा अधिकाऱ्यांना दिले आहेत.

या आदेशामधून सर्वोच्च न्यायालयाला कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ थांबवायचा आहे, तसेच कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ कायदा २०१३ ची अंमलबजावणी मजबूत करायची आहे आणि महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी यंत्रणा अधिक प्रभावी करायची आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT