Supreme Court cancels NBWL clearance granted for railway double tracking project Dainik Gomantak
गोवा

गोव्यात रेल्वे दुपदरीकरणाला NBWL ने दिलेली मान्यता सर्वोच्च न्यायालयाने केली रद्द

प्रकल्पाला विरोध करणार्‍या गावांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेला राज्यातील रेल्वे दुपदरीकरण प्रकल्प संबंधित केंद्रीय उच्चाधिकार समितीच्या (सीईसी) शिफारशींवर आज निर्णय देण्यात आला आहे. न्यायालयाने CEC शिफारशीला दुजोरा दिला असून प्रकल्पासाठी दिलेली राष्ट्रीय वन्यजीव महामंडळाची NBWL मान्यता रद्द केली आहे. (Supreme Court cancels NBWL clearance granted for railway double tracking project)

याप्रकरणी रेल्वेला पुन्हा अर्ज करण्याची परवानगी आहे. तथापि, प्रकल्पाला विरोध करणार्‍या गावांसाठी हा मोठा विजय मानला जात आहे.

मोले अभयारण्यातून जाणाऱ्या तीन रेषीय प्रकल्पांपैकी रेल्वे दुहेरीप्रकरणाचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रकल्पाला राज्यातील पर्यावरप्रेमी लोकांनी विरोध केला होता. या तीन रेषीय प्रकल्पांमध्ये तन्मार प्रकल्प, रस्ता रुंदीकरण तसेच रेल्वे दुहेरीकरण याला तिन्ही प्रकल्पांना राज्यभरातून जोरदार विरोध झाला होता. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या प्रकल्पांच्या तपासणीसाठी केंद्रीय उच्चाधिकार समितीची निवड करून त्याचा अहवाल मागितला होता. या समितीने सादर केलेल्या अहवालानुसार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यापूर्वी या समितीने वीज वाहिनीबाबतच्या तन्मार प्रकल्पाबाबत केलेली शिफारस सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT