Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: कुंपनानेच शेत खाल्लं; त्याने आपल्याच कंपनीत केली लाखाेंची चोरी

आपल्याच टेलिपॉवर कंपनीच्या गोदामामधून बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी याच कंपनीच्या सुपरवायझरला अटक केली.

दैनिक गोमन्तक

Goa News: आपल्याच टेलिपॉवर कंपनीच्या गोदामामधून अनेक प्रसंगी जुन्या टॉवरच्या तब्बल 224 बॅटऱ्या चोरल्याप्रकरणी साळगाव पोलिसांनी याच कंपनीच्या सुपरवायझरला अटक केली. हा चोरीचा मुद्देमाल 3 लाख रुपये किमतीचा आहे. रघुनाथ तुकाराम पोवार (32, रा. थिवी व मूळ कागल-कोल्हापूर) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.

साळगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या चोरीचा प्रकार हा नोव्हेंबर 2022 ते 20 जानेवारी 2023च्या दरम्यान घडलेला. संशयित रघुनाथ हा ‘डिमेलो टेलिपॉवर प्रा.लि.’ या साळगावमधील स्थित कंपनीत सुपरवायझर म्हणून कामास होता.

याप्रकरणी कंपनीचे ऑपरेशनल मॅनेजर शंशाक रोडे हे तक्रारदार आहेत. या तक्रारीनुसार साळगाव पोलिसांनी शोधमोहीम राबवत संशयितास थिवीमधून ताब्यात घेत भादंसंच्या कलम 381अन्वये त्याला अटक केली.

संशयिताने आपल्या चोरीची कबुली दिली असून त्यास न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

साळगाव पोलिस स्थानकाचे निरीक्षक मिलिंद भुईंबर यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अनिल केरकर, कॉन्स्टेबल विजय पाळणी, सर्वेश गावस, राहुल आगोळकर, निखिल नाईक यांनी संशयिताचा शोध घेत त्यास अटक केली. साळगाव पोलिस पुढील तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT