Sunil Kauthankar Congress MLA Dainik Gomantak
गोवा

'पक्षांतर टाळण्यासाठी काँग्रेस आमदारांवर बंधन लादणार'

गोवा काँग्रेसचे प्रवक्ते सुनील कौठणकर यांची माहिती, निर्बंधांवर भाष्य टाळलं

दैनिक गोमन्तक

पणजी : काँग्रेसला 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आमदारांच्या पक्षांतरामुळे मोठा फटका बसला होता. मात्र या पक्षांतराचा फटका बसलेल्या काँग्रेसने यावेळी निवडणुकीआधीच त्याचा बंदोबस्त करायचं ठरवलं आहे. काँग्रेसच्या उमेदवारांना कायदेशीर मार्गानेच आमदारकी न सोडणे बंधनकारक केलं जाणार आहे. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांवरील निर्बंधांचे स्पष्ट संकेत दिले आहेत, मात्र त्यांनी हे निर्बंध कोणते असतील यावर भाष्य करणं मात्र टाळलं आहे. (Sunil Kauthankar Congress MLA News Updates)

गोवा काँग्रेसचे (Congress) मुख्य प्रवक्ते सुनील कौठणकर यांनी साम वृत्तवाहिनीशी बोलताना काँग्रेसच्या आमदारांबाबच्या नव्या नियमांची माहिती दिली आहे. यावेळी काँग्रेसने गोवा विधानसभा निवडणुकीसाठी दिलेले उमेदवार पक्षाशी बंडखोरी करणार नाहीत अशी आम्हाला खात्री आहे. पण तरीही प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काँग्रेस आपल्या निवडून आलेल्या आमदारांना (MLA) कायदेशीर बाबींच्या माध्यमातून पक्षासोबत बांधून ठेवणार असल्याचं कौठणकर यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान कोणत्या प्रकारच्या कायदेशीर बंधनं असतील यावर त्यांनी बोलणं टाळलं.

जर एखाद्या आमदाराने निवडून आल्यानंतर पक्षांतर केल्यास त्याला लोकांना त्याचं उत्तर द्यावं लागणार, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. दरम्यान राष्ट्रवादीसोबत (NCP) महाराष्ट्रात युती असली तरीही गोव्यात काँग्रेसची फक्त गोवा फॉरवर्डसोबत युती आहे. त्यामुळे आघाडीचा निर्णय हा पक्षश्रेष्ठीच घेतील असंही कवठणकर यांनी स्पष्ट केलं. दरम्यान ज्या पक्षाचा गोव्याशी दूरदूरपर्यंत संबंध नाही, अशा तृणमूल पक्षाशी गोव्यात युती कशी करणार, असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT