Goa Sunburn 2024 Canva
गोवा

Sunburn Festival 2024: जागा नक्की नाही तरी 'सनबर्न अँथेम' सादर! 28 ते 30 डिसेंबरदरम्यान आयोजनाचे सूतोवाच

Sunburn Anthem 2024: सनबर्न आयोजकांना अद्याप महोत्सवासाठी जागा सापडत नसतानाच त्यांनी महोत्सव गीत आज सादर केले आहे. ‘खोये यहाँ’चे एक ऊर्जा देणारा ट्रॅक आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध डीजे आणि निर्माते केश्मर, उदयोन्मुख ईडीएम तारा ओटीऑट आणि गायक केले यांनी सादर केला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn Anthem 2024

पणजी: सनबर्न आयोजकांना अद्याप महोत्सवासाठी जागा सापडत नसतानाच त्यांनी महोत्सव गीत आज सादर केले आहे. ‘खोये यहाँ’चे एक ऊर्जा देणारा ट्रॅक आहे, जो आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध डीजे आणि निर्माते केश्मर, उदयोन्मुख ईडीएम तारा ओटीऑट आणि गायक केले यांनी सादर केला आहे. २८ ते ३० डिसेंबरदरम्यान सनबर्नचे आयोजन केले जाणार आहे.

केश्मरच्या वैशिष्ट्यपूर्ण इलेक्ट्रॉनिक बीट्ससोबत एथनिक संगीताची जोड देत, हा गाणं एक अविस्मरणीय महोत्सवाचा अनुभव देणारे गीत ठरणार आहे. ‘खोये यहाँ’ गीत अडीच लाखांपेक्षा जास्त जणांनी पाहिले आहे.ईडीएम प्रेमींमध्ये या गीताने खळबळ उडवून दिली आहे, ज्यामुळे सनबर्न गोवासाठी एक उत्तम मंच सज्ज झाला आहे, असे आयोजकांचे म्हणणे आहे.

ग्लोबल आणि लोकल व्हाईब्सचा जादुई संगम दरवर्षी केश्मरच्या ऊर्जेत अधिकाधिक वाढ आणतो, आणि ‘खोये यहाँ’ या महोत्सव गीतातही त्याची छाप दिसून येते. सदर ट्रॅक ग्लोबल एथनिक घटक आणि धडधडणारे ईडीएम बीट्स यांचा सुंदर संगम आहे.

गीताची परंपरा!

सनबर्नच्या महोत्सव गीतांची परंपरा आहे. अनेक विस्मरणीय महोत्सव गीते आजवरच तयार झाली आहेत. त्यात २०१५ मधील ‘बझार’ पासून ‘मंडला’, ‘शिवा’, आणि २०२१ मधील ‘अराउंड द वर्ल्ड’ पर्यंत, प्रत्येक ट्रॅकने सनबर्नच्या वारशात विशेष स्थान मिळवले आहे. आता ‘खोये यहाँ’ देखील या यादीत सामील होणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sant Dnyaneshwari Philosophy: 'ज्ञानेश्वरी' आजही जीवनाचा शाश्वत दीपस्तंभ! कृत्रिम बुद्धिमत्ता, तणाव आणि वेगवान जीवनशैलीच्या युगात विवेक, करुणा अन् संतुलनाचा मार्ग

Goa Cricket: गोवा क्रिकेट संघाची बहरीनवारी होणार? क्रिकेट विकासासाठी सामंजस्य कराराची चर्चा; मन्सूर यांनी दिले गोवा संघाला बहरीन भेटीचे निमंत्रण

9/11 हल्ल्याच्या आधी 'भारत' होता लादेनच्या टार्गेटवर! CIAच्या सीक्रेट रिपोर्टमध्ये खळबळजनक खुलासा; अल-कायदाचा जागतिक विनाशाचा मास्टरप्लॅन

शिलाहारांची सत्ता कमकुवत झाली अन् प्रतापबिंबाची कोकणावर स्वारी! १० हजारांच्या फौजेसह जिंकला प्रदेश; उजाड भूमी पुन्हा वसवण्याचा घेतला ध्यास

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

SCROLL FOR NEXT