Sunburn Festival Goa 2023 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Goa 2023: मोपा येथे सनबर्न? आमदार आर्लेकर म्हणतात अजून कन्फर्म नाही, मी CM ला भेटणार

मोपा येथे होऊ घातलेल्या सनबर्न महोत्सवाला पेडणेवासिय जोरदार विरोध करत आहेत.

Pramod Yadav

Sunburn Festival Goa 2023: गोव्यात होणारा यावर्षीचा नियोजित सनबर्न संगीत महोत्सव मोपा येथे होणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर पेडण्यातील नागरिकांनी त्याला विरोध दर्शवला आहे. पेडणेवासियांनी सरपंचना पत्र लिहून सनबर्नला परवानगी न देण्याची मागणी केली आहे. महोत्सवाचा प्रस्ताव मंजूरीच्या अंतिम टप्यात आहे अशा बातम्या समोर येताना पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी महोत्सवाबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

नियोजित सनबर्न २०२३ मोपा येथे नव्याने झालेल्या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसराच्या जवळ होणार असल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. याबाबत हालचालींना वेग आला आहे. पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सनबर्नचा मुद्दा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित करत महोत्सव पेडण्यात होऊ नये अशी मागणी केली होती.

अशात महोत्सव पेडण्यातच होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पण, आमदार प्रवीण आर्लेकर यांनी मोपा येथे सनबर्न होणार हे अद्याप कन्फर्म नसल्याचे म्हटले आहे. तसेच, ते स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेऊन याबाबत चर्चा करणार असल्याची माहिती आर्लेकर यांनी दिली आहे.

मोपा येथे होऊ घातलेल्या सनबर्न महोत्सवाला पेडणेवासिय जोरदार विरोध करत आहेत. तालुक्यातील संस्कृती यामुळे बिघडण्याची शक्यता गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. सनबर्नमध्ये मद्य, अमली पदार्थांचा वापर यामुळे तरूणाईला वाईट सवय लागतील अशीही चिंता स्थानिकांमधून ऐकायला मिळत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

Japan Earthquake: जपानमध्ये 7.5 रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप; उत्तर-पूर्वी किनारपट्टीवर त्सुनामीचा हाय-अलर्ट VIDEO

IPL 2026 Points Table: पंजाबचा 'पंजा' भारी! डबल हेडरनंतर गुणतालिकेत 'टॉपर'; मुंबई-चेन्नई अन् कोलकाताच्या गोटात चिंतेचं सावट

Israel Lebanon Map: युद्धविरामानंतर इस्रायलचा मोठा 'गेम'! नकाशाद्वारे लेबनॉनच्या भूभागावर वर्चस्व सिद्ध; हिजबुल्लासाठी धोक्याची घंटा

Vaibhav Suryavanshi Crying: टोपीने तोंड लपवले, डोळे पुसले पण हुंदका थांबेना! राजस्थानचा 'वंडर बॉय' ढसाढसा रडला; '16 सेकंदांचा' व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT