harindra Singh Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival : गोव्यातील ‘सनबर्न’चा प्रवास इथेच थांबला! हरिंद्र सिंग यांची भावनिक पोस्ट

Sunburn Festival : त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. त्यांच्या या निर्णयामागे नेमके काय कारण आहे, हे कळू शकले नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn Festival : पणजी, जगभरातील संगीत महोत्सवांच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या यादीत स्थान असलेला 'सनबर्न' यंदा अधिकच वादाच्या भोवऱ्यात सापडला.

त्यातच सनबर्नचे आयोजक हरिंद्र सिंग यांनी २०२३ सालचा महोत्सव त्यांचा गोव्यातील शेवटचा महोत्सव असल्याचे सांगितले.

सोशल मीडियात पोस्ट करत त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टनंतर चर्चांना उधाण आले आहे.डिसेंबर २०२३ मधला गोव्यातला हा माझा शेवटचा सनबर्न. हा प्रवास इथेच संपतो. मी अनेकांचा आभारी आहे. या प्रवासात खूप कष्ट,भावना आणि बऱ्याच गोष्टींचा समावेश आहे.

मी मागील इतकी वर्षे या कार्यक्रमाचे आयोजन करू शकलो, याचा मला आनंद आहे. पण पुन्हा मी ते करू शकणार नसल्याचे दु:खही आहे, असे हरिंद्र सिंग यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर लिहिले आहे.

त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. त्यांच्या या निर्णयामागे नेमके काय कारण आहे, हे कळू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT