Sunburn Festival Goa Dainik Gomantak
गोवा

Goa: ध्वनी प्रदूषणाच्या पुराव्यांच्या आधारे कारवाई; सनबर्न आयोजकांविरुद्ध जानेवारी अखेरपर्यंत गुन्हा दाखल होणार?

ध्वनी प्रदूषणप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्याचे उल्लंघन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa: वागातोर येथील सनबर्न महोत्सवावेळी झालेले ध्वनी प्रदूषण रोखण्यात सरकारी यंत्रणेला अपयश आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

याप्रश्‍नी मुख्य सचिवांनी जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध काय कारवाई केली व कारवाईची प्रक्रिया किती वेळेत पूर्ण होणार, यासंदर्भातील माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने देत याची सुनावणी 23 जानेवारीपर्यंत तहकूब केली.

सनबर्न महोत्सवात ध्वनिप्रदूषण होत असल्याचे सरकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले असतानाही सरकारी यंत्रणेने कारवाई करण्यात हयगय केली. हे प्रदूषण रोखण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व पोलिस अधिकाऱ्यांनी काहीच केले नाही.

30 डिसेंबर रोजी सनबर्न महोत्सवात ध्वनी प्रदूषण झाल्याचे उघडकीस आल्यानंतर हणजूण पोलिस निरीक्षक व म्हापसा उपविभागीय अधिकाऱ्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांनी आपली भूमिका प्रतिज्ञापत्राद्वारे सादर करावी.

ध्वनी प्रदूषणाच्या पुराव्यांच्या आधारे सनबर्न आयोजकांविरुद्ध जानेवारी अखेरपर्यंत गुन्हा दाखल करणार, असे प्रदूषण नियंत्रण मंडळाने सांगितले आहे.

तथापि, ध्वनी प्रदूषणावर देखरेख ठेवण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या ‘त्या’ चार अधिकाऱ्यांनी हणजूण पोलिसांना कोणती माहिती दिली होती त्याचे प्रतिज्ञापत्र 12 जानेवारीपर्यंत सादर करावे.

आयोजकांकडून बँक गॅरंटीसाठी 19 लाख रुपये घेतले आहेत. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावून ही रक्कम का जप्त करू नये, यावर त्यांची बाजू ऐकून घेऊन पुढील कारवाई काय केली याची माहिती द्या.

यापूर्वीही ध्वनी प्रदूषणप्रकरणी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन न करता त्याचे उल्लंघन झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan Comeback: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT