Sunburn Festival Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival In Goa : ‘सनबर्न’वर मर्यादेमुळे किनाऱ्यांवर नाईट पार्ट्या

Sunburn Festival In Goa: ध्‍वनिप्रदूषण रोखणार कोण? आयोजकांची ‘फिल्‍डिंग’

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn Festival In Goa : मोरजी, वागातोरला आजपासून तीन दिवस होणाऱ्या सनबर्न महोत्सवात सहभागी होण्यासाठी जगभरातून लाखो पर्यटक गोव्यात दाखल झाले आहेत.

तेथे रात्री १० पर्यंत संगीत चालेल. तसेच तेथे ध्‍वनिप्रदूषणावर नियंत्रणासाठी अधिकारी सज्‍ज झाले आहेत; परंतु आश्‍‍वे, मांद्रे, मोरजी भागात रात्री उशिरापर्यंत संगीतरजनी वा पार्ट्या होतील, त्‍या रोखणार कोण, असा उपस्‍थित होत आहे.

लाखो पर्यटकांना संगीताच्या तालावर झुलवत २८, २९ व ३० रोजी हा संगीत जलसा रात्री १० पर्यंत चालणार आहे. मात्र रात्री दहानंतर येथे येणारे अनेक पर्यटक अन्य किनारी भागातील पाटर्यांकडे मोर्चा वळवणार असल्याने संपूर्ण किनारपट्टी भागात सनबर्नचा माहोल दिसून येणार आहे.

सनबर्नमधील पर्यटकांना आपल्याकडे वळविण्यासाठी पार्टी आयोजकांनी मोठी ‘फिल्‍डिंग’ लावलेली आहे. तेथे अधिकारी नियंत्रण कसे करणार हा प्रश्‍‍न आहे.

जगातील पर्यटकांचे लक्ष वेधणाऱ्या सनबर्न हा आंतरराष्ट्रीय संगीत इव्हेंट दरवर्षी बार्देश तालुक्यातील किनारीभागात आयोजित केला जातो. यात लाखो पर्यटक सहभागी होतात. रात्री दहापर्यंत संगीत वाजवण्यास मुभा आहे. न्यायालयाने याबाबत सक्त निर्देश दिले आहेत. त्यामुळे रात्री दहा वाजता संगीत बंद झाल्यानंतर येथे येणारे पर्यटक कुठे जाणार?

याचा फायदा किनारपट्टीतील काही पार्टी आयोजकांनी उठवण्याची पूर्ण तयारी केली आहे. पेडणे तालुक्यातील मोरजी, आश्वे, मांद्रे तसेच राज्यातील अन्य किनारी भागात मोठे संगीत जल्लसे भरणार आहेत. यात सनबर्नमधील पर्यटकांना सहभागी करून घेण्याची तयारी चालली आहे.

सरकारी आशीर्वाद...

रात्री १० नंतर राज्यात संगीत वा ध्वनी प्रदूषणास करण्यास बंदी असली तरी किनारी भागात सर्रास हे नियम मोडले जातात व मोठ्या प्रमाणात संगीत रजनींचे आयोजन केले जातात. सरकारी यंत्रणांच्या आशीर्वादाने रात्रभर मोठ्या आवाजात संगीत वाजवले जाते. लोकांचे म्हणणे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT