Sunburn 2024 Dainik Gomantak
गोवा

Sunburn Festival: 'सनबर्न'ला आधी विरोध नंतर स्वागताचे बॅनर! Social Mediaवर 'लोकांच्या मताला किंमत किती?’ प्रश्नाची सरबत्ती

Goa Sunburn 2024: विविध भागातून मोठ्या संख्येने देशी तथा विदेशी नागरिक सनबर्न महोत्सवात सहभागी होण्यासाठी पेडणे तालुक्यात आणि खास करून धारगळमध्ये दाखल झाले होते.

Sameer Panditrao

Sunburn 2024 pravin arlekar controversy

धारगळ: विविध भागातून मोठ्या संख्येने देशी तथा विदेशी नागरिक सनबर्न महोत्सवात सहभागी होण्यासाठी पेडणे तालुक्यात आणि खास करून धारगळमध्ये दाखल झाले होते. धारगळ येथील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या पठारावर सनबर्न महोत्सव आयोजित करण्यात आला. यासाठी भव्य रंगमंच घालण्यात आला. विद्युत रोषणाई तसेच डीजेच्या तालावर आज रात्री तरुणाईचे पाय थिरकले.

‘सनबर्न नको’ असा विरोध करणाऱ्या स्थानिकांना डावलून या ईडीएम फेस्टिव्हलला सुरुवातीला पंचायतीने परवानगी दिली आणि हा विरोध आणखी चिघळला. त्यानंतर हा प्रवास न्यायालयाच्या दिशेने वळला आणि आयोजकांना कायदेशीर परवानगी घेऊन फेस्टिव्हल करण्यास न्यायालयाने मान्यता दिली. अखेर सनबर्न आयोजकांना सरकारनेही सशर्त परवानगी दिली आणि मोठ्या गाजावाजात आजपासून धारगळमध्ये ‘सनबर्न’ फेस्टिव्हल सुरू झाला.

पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सुरुवातीला स्थानिक नागरिकांसोबत सनबर्नला विरोध केला होता. मात्र, आता फेस्टिव्हलच्या आयोजनासाठी त्यांचे स्वागत करणारे बॅनर धारगळ आणि परिसरात झळकत आहेत. सामाज माध्यमांवर आर्लेकर यांच्या या भूमिकेवर तीव्र टीका होत असून, ‘लोकांच्या मताला किंमत किती?’ असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT