Goa Army  Dainik Gomantak
गोवा

Indian Army: कुडचडेचे सुमेर डिकुन्हा यांना लेफ्टनंट जनरलपदी बढती

Indian Army: गोव्‍यासाठी सन्‍मान : हवाई दल महासंचालकपदाची सांभाळणार जबाबदारी

दैनिक गोमन्तक

Indian Army: भारतीय लष्करात मेजर जनरल पदावर कार्यरत असलेले सुमेर इव्हान डिकुन्हा यांना लेफ्टनंट जनरलपदी बढती देण्यात आली आहे. नवी दिल्लीतील लष्करी मुख्यालयात हवाई दलाच्या महासंचालकपदाची जबाबदारी ते सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे, डिकुन्हा यांचा फक्त १३ महिन्यांत ब्रिगेडियर ते मेजर - जनरल ते लेफ्टनंट जनरल असा बढत्यांचा प्रवास झाला आहे.

डिकुन्‍हा हे कुडचडेचे सुपुत्र आहेत. डिकुन्हा हे इंडियन मिलिटरी अकादमी, डेहराडूनचे माजी विद्यार्थी आहेत आणि डिसेंबर १९९८ मध्ये हवाई दलात रुजू झाले होते. ते कुडतरी येथील असून दिवंगत मेजर जनरल इव्हान डिकुन्हा आणि जेमा पिंटो यांचे सुपुत्र आहेत. जेमा यांचा लेखक, शिक्षक आणि एक व्यक्तिमत्व विकास प्रशिक्षक म्हणून लौकीक आहे. डिकुन्हानी सेवेत आजपर्यंत उत्कृष्ट कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

पत्नी फराह शहीद युस्टेड यांची कन्या

सुमेर यांच्या पत्नीचे नाव फराह आहे. फराह या मेजर जनरल युस्टेस फर्नांडिस यांच्या कन्या आहेत. युस्टेड हे काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले होते. सुमेर आणि फराह यांचा मुलगा अर्जुन याने आयआयटी पूर्ण केली आहे. मुलगी अंजली ही पेशाने वकील आहे, तसेच उत्कृष्ट पियानोवादक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mangal Gochar 2026: मंगळाचे पुष्य नक्षत्रात गोचर! 24 सप्टेंबरनंतर 'या' लोकांवर होणार धनाची बरसात; सकाळी 5:50ची वेळ ठरणार गेमचेंजर

8th Pay Commission Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना लागणार लॉटरी! 18000 मूळ वेतन असणाऱ्यांना मिळणार 68 हजारांपेक्षा जास्त बेसिक पे? फिटमेंट फॅक्टर बदलणार नशीब

150 वर्षांची परंपरा; तिसरी पिढीही मूर्तीकलेत व्यस्त, मोरजीतील पोके कुटुंबाची चित्रशाळा; पोर्तुगालमध्येही दिले शिल्पकलेचे धडे

इराणच्या हाती लागला मोठा 'जॅकपॉट'! सापडला 7.5 ट्रिलियन क्यूबिक फीट गॅसचा महाखजिना; नव्या हायड्रोकार्बन साठ्याने अमेरिकेचे दणाणले धाबे

Pre Primary Teachers Salary Hike: पगारवाढीच्या प्रतीक्षेत पूर्वप्राथमिक शिक्षिका, मुख्यमंत्र्यांकडे कैफियत; प्राथमिक शिक्षकांप्रमाणे वेतनवाढीची मागणी

SCROLL FOR NEXT