CM Pramod Sawant In Kolhapur Dainik Gomantak
गोवा

CM Pramod Sawant In Kolhapur: ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ म्हणजे ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिबिंब- सावंत

कोल्हापूर, कणेरी मठ येथे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थानद्वारा सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवाचे आयोजन

गोमन्तक डिजिटल टीम

CM Pramod Sawant In Kolhapur कोल्हापूरच्या कणेरी मठ येथे श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सवा’निमित्त ‘संत समागम एवं कुलपति समागम’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी व्यासपीठावर अध्यक्षस्थानी श्री क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंच्या महास्वामी, गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भैय्या जोशी, आमदार सुभाष देशमुख, काडसिध्देश्वर स्वामी महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.

CM Pramod Sawant In Kolhapur

यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. या प्रदर्शनाचे दृष्य परिणाम लवकरच दिसून येतील.

हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिबिंब असल्याचे गौरवोग्दार काढून भारत विश्व गुरु होण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या साधु संतांचे आशिर्वाद मिळावेत असे सांगून मुदत संपल्यानंतरही हे प्रदर्शन आणखीन पाच दिवस सुरु ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

CM Pramod Sawant In Kolhapur

हा महोत्सव यशस्वी केल्याप्रित्यर्थ सर्व साधु संतांच्यावतीने काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचा वेद घोषाच्या मंत्रात यावेळी गणेश मूर्ती व शाल देवून राज्यपाल गेहलोत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भैय्या जोशी यांनीही आपले समयोचित विचार व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जगाचा नकाशा अचूकतेने मांडण्याच्या UN च्या प्रस्तावाला भारताचा पाठिंबा, पण J&K आणि लडाखच्या सीमांबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिला स्पष्ट इशारा

Keri Ambulance Service: केरीला मिळाली 3 दिवसांत 108 रुग्णवाहिका; विधानसभेत आरोलकरांनी प्रश्न उपस्थित करताच सरकारची कार्यवाही

Accident Death: दारूची नशा बेतली जीवावर; दुचाकीवरील ताबा सुटला, नाल्यात पडून 30 वर्षीय युवकाचा मृत्यू

Bank Job: SBI मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! 12,000 जागांसाठी होणार मेगाभरती, 250 नव्या शाखा सुरू करण्याचा बँकेचा प्लॅन

Congress Dalit Tribal Support: दलित-आदिवासींची साथ मिळवणे काँग्रेससाठी सोपे नाही! राहुल गांधींसमोर मोठे राजकीय आव्हान

SCROLL FOR NEXT