Sukesh Chandrasekha 
गोवा

गोवा निवडणुकीसाठी मेडिकल फर्मने 'आप'ला 13 कोटी रुपये दिले, सुकेशचे दिल्लीच्या LG ना पत्र, केले गंभीर आरोप

सुकेशने या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशीची मागणी केली आहे.

Pramod Yadav

Sukesh Chandrasekhar: तिहार तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर याने दिल्लीचे उपराज्यपालांना व्हीके सक्सेना यांना एक पत्र लिहिले आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारी रुग्णालयांमधून रक्ताचे नमुने गोळा करण्यासाठी मेट्रोपोलिस लॅबला कंत्राट देण्यात आले. हे कंत्राट देण्यासाठी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.

याच कंपनीद्वारे गोवा निवडणुकीसाठी 13 कोटी रुपये जमा झाले होते. असाही आरोप सुकेश चंद्रशेखरने केलाय. तसेच, सुकेशने या प्रकरणाची सीबीआय आणि ईडी मार्फत चौकशीची मागणी केली आहे.

केजरीवाल यांनी दिल्लीतील वेगवेगळ्या सरकारी रुग्णालयांचे कंत्राट त्याच मेडिकल लॅबला दिले आहे, ज्याद्वारे गोवा निवडणुकीसाठी 13 कोटी रुपये जमा झाले. असे सुकेश यांनी पत्रात लिहिले आहे. केजरीवाल सरकारने मेट्रो पोलिस प्रयोगशाळा आणि पॅथॉलॉजी सेंटर या खासगी कंपनीला वैद्यकीय कंत्राट दिले आहे.

माझ्या कर्मचार्‍यांनी 13 कोटी रुपये महानगर कार्यालयातून गोळा केले होते आणि त्यामागे सत्येंद्र जैन यांचा कट होता. 13 कोटींपैकी 5 कोटी बेंगळुरूला पाठवण्यात आले. ते 5 कोटी रुपये बेंगळुरूच्या इंदिरा नगरमध्ये राहणारे सत्येंद्र जैन यांचा पुतण्या डॉ. हिमेशला पाठवण्यात आले होते. उर्वरित 8 कोटी रुपये गोव्यात पाठवण्यात आले होते. असे सुकेशने पत्रात म्हटले आहे.

मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि सतेंद्र जैन यांचा प्रकरणात खूप जवळचा संबध आहे. त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्याने आणि तपशीलवार चौकशी झाली पाहिजे. अशी मागणी त्याने पत्राद्वारे केली आहे. केजरीवाल सरकारने मेट्रोपॉलिस लॅबला दिलेल्या कंत्राटांची तपशीलवार चौकशी करण्याची विनंती एलजीला केली.

केजरीवाल आणि माजी जैन यांच्या निकटवर्तीय असलेल्या या कंपनीला अनेक कंत्राटे देण्यात आली होती. असाही आरोप सुकेशने केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Vs Oman: 126 धावांनी ओमानचा धुव्वा! गोव्याने परदेशात रचला मालिका विजयाचा इतिहास

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

SCROLL FOR NEXT