Goa suicide News dainik Gomantak
गोवा

Goa News: ढवळीत विद्यार्थ्याची आत्महत्या

Goa News: कोने-ढवळी येथे उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या रौनक अशोक गावडे (१७) या विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

दैनिक गोमन्तक

Goa News: कोने-ढवळी येथे उच्च माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या रौनक अशोक गावडे (१७) या विद्यार्थ्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्‍महत्‍या करण्‍यापूर्वी त्‍याने चिठ्ठी लिहून ठेवली असून त्‍यात ‘काही कारणास्तव मी आत्महत्या करीत आहे’ असे म्हटले आहे.

हा प्रकार मंगळवारी संध्‍याकाळी उघडकीस आला. रौनक हा हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता. खेळांतही तो पुढे असायचा. मनमिळाऊ स्वभावाच्या रौनकने आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाला तसेच मित्रपरिवाराला प्रचंड धक्का बसला आहे.

फोंडा पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला होता. आज (बुधवारी) दुपारी स्थानिक स्‍मशानभूमीत त्‍याच्‍या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

गळफास घेऊन पोलिसाने केला जीवनाचा अंत

फोंडा तालुक्यातील बेताळभाट-सावईवेरे येथील योगेश्‍‍वर सुरेश सावंत या ३६ वर्षीय पोलिस कॉन्स्टेबलने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

योगेश्‍‍वर पोलिस खात्याच्या भारतीय राखीव दलात (आयआरबी) रायबंदर स्थानकात सेवा बजावत होता. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकले नाही.

परंतु गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे समजते. सुमारे पाच वर्षांपूर्वी योगेश्‍‍वरचे वडील सुरेश सावंत (मूळ रा. एकोशी-पोंबुर्फा) तर आठ महिन्यांपूर्वी आईचा मृत्यू झाला होता.

कोलव्‍यात युवकाने केली आत्‍महत्‍या

मोरपिर्ला येथील सिद्धेश वेळीप या 26 वर्षीय युवकाने कोलवा परिसरात गळफास घेऊन आत्‍महत्‍या केली. आत्‍महत्‍येचे कारण समजू शकले नाही.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आत्‍महत्‍येची घटना १९ नोव्‍हेंबर रोजी मध्‍यरात्री घडली. कोलवा पोलिसांनी अनैसर्गिक मृत्‍यू म्‍हणून या घटनेची नोंद केली आहे. पोलिस उपनिरीक्षक सुभाष गावकर तपास करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT