Sudip Tamhankar Dainik Gomantak
गोवा

Land Grabbing Case: गोवा सरकारच्या अधिकाराखालील आल्वारा जमिनीची चौकशी एसआयटीतर्फे करा- सुदीप ताम्हणकर

Land Grabbing Case: गोव्यात जमीन हडपप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी होतात, मात्र सरकारच्या आल्वारा जमिनीची चौकशी का करण्यात येत नाही?

दैनिक गोमन्तक

Land Grabbing Case: गोवा राज्यातील जमीन हडपप्रकरणी एसआयटीमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र सरकारच्या आल्वारा जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणात उभी राहिलेल्‍या परप्रांतियांच्‍या हॉटेल्सची चौकशी करण्यात येत नाही. सात वर्षापूर्वी ‘कॅग’ने सादर केलेल्या अहवालात त्याचा उल्लेख आहे. त्यामुळे सरकारने ही चौकशीही एसआयटीमार्फत करण्याची मागणी आरटीआय कार्यकर्ते सुदीप ताम्हणकर यांनी केली.

राज्यात सरकारच्या अधिकाराखाली असलेल्‍या आल्वारा जमिनीवर अतिक्रमण करून ती परप्रांतियांना उद्योग व व्‍यवसायासाठी वितरित करण्यात आलेली आहे. यासंदर्भातचा उल्लेख 31 मार्च 2015 रोजी कॅगने सरकारला दिलेल्या अहवालात नमूद केला आहे. या प्रकरणाची चौकशी होण्याची गरज असल्याचा शेराही मारला होता.

मात्र आजपर्यंत त्याची चौकशी करण्यात आलेली नाही. सध्या एसआयटीमार्फत बनावट दस्तावेजांचा वापर करून अनेकांच्या जमीन हडप केल्याप्रकरणी चौकशी सुरू आहे. आल्वारा जमिनीच्या विभाजनामध्ये सरकारी अधिकारी व काही राजकारणी गुंतलेले आहेत. त्यांची चौकशी करून कारवाई होण्याची गरज आहे असे ताम्हणकर म्हणाले.

जमिनी हडपल्‍या

पेडणे तालुक्‍यातील मांद्रे येथील सुमारे 19.54 लाख चौमी आल्वारा जमीन तसेच सालसेत, सत्तरी, सांगे व धारबांदोडा तालुक्यातील आल्वारा जमिनींबाबत सर्व कायदे धाब्यावर बसवून म्युटेशन प्रक्रिया करण्यात आली व त्या हडपण्यात आल्या.

खासगी जमिनींच्या हडपप्रकरणी चौकशी करताना सरकारी जमिनींचीही एसआयटीमार्फत फौजदारी बाजूची चौकशी करण्यात येत आहे. तर त्यातील इतर सविस्तर बाजू तपासण्यासाठी निवृत्त न्यायमूर्तीची एकसदस्यीय आयोग नेमण्यात आला आहे.

ही चौकशी केल्यास अनेक सरकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या म्युटेशन प्रक्रियेचे काळेबेरे उघडकीस येईल असे ताम्‍हणकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT