Sudin Dhavalikar Dainik Gomantak 
गोवा

'सुदिन ढवळीकरांना महत्त्वाची खाती मिळणार नाहीत'

खातेवाटप: आणखी चार दिवस प्रतीक्षा

दैनिक गोमन्तक

पणजी: मगोपला पक्षश्रेष्ठींच्या आग्रहाखातर मंत्रिमंडळात सामावून घेतले असले तरी त्यांनी वीज यासारखे महत्त्वाचे खाते दिले जाणार नाही. शिक्षण खाते भाजपसाठी महत्त्वाचे असल्याने तेही त्यांना दिले जाऊ नये, यासाठी भाजपमधील दबावगट काम करत आहे. नव्याने मंत्रिमडळात समावेश केलेले तीन मंत्री आणि भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष यांना एकाबरोबरच खाती व महामंडळे दिली जाणार आहेत. त्यासाठी चर्चा सुरू आहे. रविवारी रामनवमीमुळे यासंदर्भात कोणताही खल झाला नाही. प्रत्यक्ष खातेवाटपासाठी आणखी चार दिवस लागू शकतात.

भाजप सूत्रांनी ‘गोमन्तक’ला दिलेल्या माहितीनुसार, सध्या वाटप न झालेल्या खात्यांमध्ये वीज आणि शिक्षण ही दोन महत्त्वाची खाती आहेत. ज्येष्ठतेनुसार सुदिन ढवळीकर यांना वीज खाते दिले जाऊ शकत होते. ढवळीकरांनाही वीज आणि शिक्षण दोन्ही महत्त्वाची खाती हवी आहेत. परंतु वीज खाते त्यांना देण्यास भाजपच्या सुकाणू समितीने विरोध केला आहे.

‘वीज खाते लोकांचे समाधान करण्यासाठी महत्त्वाचे खाते आहे आणि ते भाजपच्या सदस्यांकडेच असावे, असा आमचा आग्रह आहे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना आमचा दावा पटला आहे’ अशी माहिती भाजपच्या सुकाणू समितीच्या एका ज्येष्ठ सदस्याने ‘गोमन्तक’ला दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ढवळीकर यांनी भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी संपर्क साधला आहे. आपल्याला सार्वजनिक बांधकाम खाते द्यावे. मगोप भविष्यामध्ये भाजपबरोबर राहू इच्छितो. तशी ग्वाही आम्ही देण्यास तयार आहोत. त्यासाठी महत्त्वाचे खाते आम्हाला मिळणे भाग आहे, असा युक्तिवाद ढवळीकर यांनी केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT