Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar : भूमिगत वीजवाहिन्यांसाठी ‘तम्नार’ला पर्याय नाही

गोव्यात 24 तास अखंड सेवेचा प्रयत्न असल्याची मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती

दैनिक गोमन्तक

पणजी : राज्यातील विजेची निकड लक्षात घेता येत्या काही वर्षांमध्ये विजेच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ होणार आहे. त्यामुळे तम्नार वीज प्रकल्पाला पर्याय नाही. याशिवाय मिळणारी वीज भूमिगत वाहिन्यांमार्फत दिल्यास ती अधिक सुरळीतपणे मिळू शकते. त्यामुळे येत्या काही वर्षांत टप्प्या-टप्प्याने राज्यात भूमिगत वीजवाहिन्या घालण्यात येतील आणि 24 तास अखंडित सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी सभागृहात दिली.

सरकारच्या वतीने मांडलेल्या अनुदानित मागण्यांवर उत्तर देताना मंत्री ढवळीकर बोलत होते. या मागण्यांच्या विरोधात विरोधकांनी कपातीची मागणी केली होती. त्या फेटाळून सरकारच्या मागण्या मान्य करण्यात आल्या. यावर आज सविस्तर चर्चा झाली. प्रामुख्याने किनारी भागात सातत्याने खंडित होणाऱ्या विजेमुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत असल्याने सभागृहात विरोधक आक्रमक झाले, असे यावर उत्तर देताना सुदिन ढवळीकर म्हणाले.

मी मंत्री झाल्यापासून खात्याला 60 ते 70 कोटी रुपयांचा फायदा करून दिला असून उन्हाळ्यातही सर्वसामान्यांबरोबरच उद्योजकांनाही वीज उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. आता गोव्यातील जनतेला 24 तास अखंडित वीज देण्याचा आमचा प्रयत्न असून ती कमीत कमी दराने मिळावी, यासाठी खात्याकडून प्रयत्न सुरू आहेत. राज्याची दीर्घकालीन विजेची गरज लक्षात घेता, अतिरिक्त 200 ते 250 मेगावॅट विजेची गरज आहे. ती तम्नारकडून मिळू शकते. सध्या जुन्याच वीज यंत्रणेवरून अतिरिक्त वीज घेतली जात आहे. मात्र, भविष्यात ही निकड वाढणार आहे. त्यामुळे कमीत कमी वृक्षतोड करून या वीजवाहिन्या सुरू करणे मोठे आव्हान आहे, असेही सुदिन ढवळीकरांनी स्पष्ट केलं आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार! ODI World Cup 2027 मध्ये एकाच ग्रुपमध्ये दोन्ही संघ; टीम इंडियाचं संपूर्ण Schedule एका क्लिकवर

Industries Load Shedding: उद्योगांना वीज भारमानाचा मोठा फटका; सायंकाळी 5 ते रात्री 1 पर्यंत 50 ते 100 टक्के लोडशेडिंग

Horoscope: शुक्रवार ठरणार लकी! 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार आनंदाची बातमी, आर्थिक संकटे दूर होऊन प्रगतीचे मार्ग मोकळे होणार

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

SCROLL FOR NEXT