Sudin Dhavalikar Dainik Gomantak
गोवा

पुस्तके विद्यार्थ्यांच्या हातात दिसायला हवीत: सुदिन ढवळीकर

फर्मागुढी गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयात पुस्तकदिन

दैनिक गोमन्तक

फोंडा: पुस्तक हे आपले मित्र आहेत. ज्ञानाचा खजिना हा पुस्तकातून उपलब्ध होतो, म्हणून पुस्तके केवळ कपाटाची शोभा न बनता विद्यार्थ्यांच्या हातात दिसणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करून फर्मागुढी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उत्कर्षासाठी आपण सदोदित कार्यरत राहिलो आहे, आताही नवनवीन सुविधा फर्मागुढीतील या शैक्षणिक संस्थांना उपलब्ध करण्यासाठी प्रयत्न करीन, अशी ग्वाही वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी दिली.

फर्मागुढीत काल (शनिवारी) गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या खाण अभ्यासक्रम विभागात जागतिक पुस्तकदिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एआयसीटीईचे अध्यक्ष डॉ. अनील सहस्त्रबुद्धे, तांत्रिक शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. विवेक कामत तसेच गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. बी. लोहानी आदी उपस्थित होते.

सुदिन ढवळीकर म्हणाले, पुस्तके आपल्याला जीवनाची मूल्ये शिकवतात, या मूल्यातूनच आपण पुढील यशस्वी वाटचाल करू शकतो. पुस्तकांच्या माध्यमातून अधिकाधिक ज्ञानार्जन करताना मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग इतरांसाठी व्हायला हवा. त्यादृष्टीने प्रत्येक शैक्षणिक संस्थांनी कार्यरत राहिले पाहिजे. अभियंत्रिकी महाविद्यालयाने जागतिक पुस्तकदिनानिमित्त विद्यार्थ्यांतील ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी आयोजित उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले.

डॉ. अनील सहस्त्रबुद्धे म्हणाले, शिक्षण ही ज्ञान संपादन करण्याची निरंतर प्रक्रिया आहे. शिक्षण घेताना त्यातून नवीन संकल्पना निर्माण व्हायला हव्यात, विशेषतः तांत्रिक शिक्षणातून नवीन कल्पना आणि उपक्रम साकारणे शक्य असून अभियांत्रिकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने प्रयत्न करावेत. आत्मनिर्भर भारताचा संकल्प केला आहे, हा संकल्प पूर्ण झाला तर जगात भारत इतरांपेक्षा निश्‍चितच सरस बनेल, असे सांगून गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या उपक्रमांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

डॉ. विवेक यांनी प्रास्ताविक केले तर डॉ. आर. बी. लोहानी यांनी स्वागत केले. स्पर्धांतील विजेते विद्यार्थी तसेच उपक्रमातील यशवंत महाविद्यालयाचे प्राध्यापक, कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला. डॉ. अनील सहस्त्रबुद्धे यांनी विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधून त्यांना मौलिक मार्गदर्शन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Domestic Violence Case: 4 तास अघोरी छळ आणि जीवघेणा ड्रामा! हिस्ट्रीशीटरचा बायकोवर अमानुष अत्याचार; 25 वर्षीय नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Mapusa Municipality: म्हापशातील नोकरभरतीत नियमांचे उल्लंघन! पालिकेतील पदोन्नतीवर प्रश्नचिन्ह, 11 कर्मचाऱ्यांची बढती वादाच्या भोऱ्यात

Goa Bison Attack: गव्याच्या हल्ल्यात महिला गंभीर जखमी, पाठीत शिंग खुपसले; स्थानिकांत भीतीचे वातावरण

June Lucky Zodiac Signs: व्यापाऱ्यांना बंपर नफा, तर नोकरदारांना प्रमोशन! जून महिन्यात 6 राशींचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पैशांचा होणार पाऊस

Goa Politics: गोवा फॉरवर्ड अजूनही काँग्रेस युतीचा घटक! आमची भूमिका निश्चितपणे मांडू- विजय सरदेसाई

SCROLL FOR NEXT