Sudin Dhavalikar  Dainik Gomantak
गोवा

Sudin Dhavalikar : ‘रवळनाथ’चे योगदान उल्लेखनीय! कुंडईत सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात कलाकारांचा सत्कार

सुदिन ढवळीकर : कुंडईत सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात कलाकारांचा सत्कार

दैनिक गोमन्तक

ग्रामीण रंगभूमीमुळे भारतीय नाट्यसृष्टी समृद्ध झाली आणि गोमंतकीय कलाकारांनी नाट्यकला जिवंत ठेवण्यासाठी खडतर मेहनत घेतली त्यामुळेच आज गोव्यात नाट्यकला बहरली, असे उद्गार मडकई मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी काढले.

कुंडईतील रवळनाथ नाट्यसमाजाला तर फार मोठी परंपरा असून ही परंपरा युवा वर्गाने पुढे न्यावी, असे आवाहन ढवळीकर यांनी केले.

गुरवसवाडा-कुंडई येथील रवळनाथ नाट्यसमाजाच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सुदिन ढवळीकर बोलत होते. काल झालेल्या या कार्यक्रमाला श्रीधर कामत बांबोळकर, सामाजिक कार्यकर्ते मिथिल ढवळीकर, कुंडईचे सरपंच सर्वेश जल्मी, दुर्गाकुमार नावती, फोंडू नाईक, रोहिदास कुंडईकर, पंचसदस्य रूपेश कुंडईकर, सुहास कुंडईकर व उत्तम कुंडईकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात ज्येष्ठ कलाकारांचा सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह

देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन वैकुंठ नाईक यांनी केले तर स्वागत महादेव परवार यांनी केले.

स्वातंत्र्यानंतर आपल्या देशातील कलेला बहर आला. या कलेला लोकाश्रय मिळाला होताच; पण आता राजाश्रय मिळाल्यामुळे कलेच्या उत्कर्षासाठी ते उपयुक्तच ठरले आहे. गोवा ही कलाकारांची भूमी आहे. त्यामुळे पुढील काळात युवा वर्गाने कलेच्या क्षेत्रात आपले करिअर घडविण्यासाठी प्रयत्न करावेत. रवळनाथ नाट्यसमाजाने कलेच्या क्षेत्रात दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.

- सुदिन ढवळीकर, वीजमंत्री

त्याकाळी पुरुषांकडूनच स्त्रीपात्र...

गोव्यात नाट्यपरंपरा फार मोठी आहे. प्रतिकूल परिस्थितीतही गोमंतकीय कलाकारांनी नाट्यकला जपली. पूर्वीच्या काळी वीज, ध्वनी यंत्रणा नव्हती, तरीही नाट्यप्रयोग छान व्हायचे. स्त्री भूमिका पुरुषच करायचे. आज महिला कलाकार पुढे येतात, ही कौतुकास्पद बाब आहे. कुंडईतील शशिकला कुंडईकर यांनी नाट्यकलेच्या क्षेत्रात हे परिवर्तन आणण्यासाठी प्रयत्न केले, असे गौरवोद्गारही सुदिन ढवळीकर यांनी काढले..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT