Sonali Phogat Case | Sudhir Sangwan | Goa Crime Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : सुधीर सांगवान आणि सुखविंदर सिंग यांच्या पोलीस कोठडीत वाढ

सोनाली फोगट हत्या प्रकरणात संशयित सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : सोनाली फोगट हत्या प्रकरणात संशयित सुधीर संगवान आणि सुखविंदर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. दोघांनाही म्हापसा कोर्टाने आणखी दोन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आज गुरुवारी म्हापसा कोर्टात सोनाली फोगट प्रकरणी सुनावणी झाली, त्यावेळी कोर्टाने ही कोठडी वाढवली आहे.

हणजुण पोलिसांनी मंगळवारी झालेल्या सुनावणीवेळी कोर्टाकडे संशयितांची 4 दिवसांसाठी कोठडी मागितली होती मात्र कोर्टाने आरोपींना 2 दिवसांची कोठडी सुनावली होती. आज गुरुवारी पोलिसांनी दोन्ही आरोपींना पुन्हा कोर्टात हजर करत त्यांच्या वाढीव कोठडीची मागणी केली. कोर्टाने ती मान्य करत आरोपींची पोलीस कोठडी दोन दिवसांनी वाढवली आहे. याप्रकरणी म्हापसा कोर्टात 10 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार असून दोन्ही आरोपींना पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार आहे.

दरम्यान सोनाली फोगट मृत्यू प्रकरणाशी संलग्न असलेल्या कर्लीस रेस्टॉरंटचा चालक एडविन नुनिस यास म्हापसा अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायालयाने बुधवारी सशर्त जामीन मंजूर केला. यामध्ये संशयितला कर्लीस रेस्टॉरंटमध्ये जाता येणार नाही, ही महत्त्वाची अट घातली आहे. त्याशिवाय परवानगीशिवाय गोव्याबाहेर जाता येणार नाही व तपास कामात हस्तक्षेप करता येणार नाही या अटींचा समावेश आहे.

तसेच दत्तप्रसाद गावकर, रामदास माद्रेकार व एडविन नुनिस यांना पोलीस कोठडी देण्यात यावी, हा हणजूण पोलिसांनी केलेल्या मागणीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT