Panaji Dainik Gomantak
गोवा

Panaji News : ढवळीकर-आरजी कार्यकर्त्यांमध्ये धुमश्‍चक्री; बांदोड्यात काही काळ तणाव

Panaji News : : मंत्र्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

Panaji News :

पणजी, पंचायत चलो’ अभियानाच्या बांदोडा येथील कार्यक्रमावेळी नगरनियोजन मंत्री विश्वजीत राणे यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘रिव्हॉल्युशनरी गोवन्स'' पक्षाच्या कार्यकर्त्यांना आमदार तथा वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी रोखण्याचा प्रयत्न केल्याने घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी दोन्ही गटांमध्ये जबरदस्त बाचाबाची तर झालीच; पण शेवटी ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी मंत्र्यांच्या विरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली आहे.

बांदोडा येथे शनिवारी हा प्रकार दुपारी घडला. ‘पंचायत चलो’ अभियानाचा कार्यक्रम सुरू असतानाच हा वाद उफाळून आल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांच्यासमोर या भागातील विविध पान ११ वर

मंत्र्यांना राग का आला?

वीजमंत्री ढवळीकर यांनी गळा आवळून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार विश्‍वेश नाईक यांनी फोंडा पोलिस स्थानकात दिली आहे. मी फक्त प्रश्‍न विचारला होता; पण ढवळीकर यांना का राग आला ते ठाऊक नाही; पण असा प्रकार लोकशाहीसाठी लांच्छनास्पद असल्याचे विश्‍वेश नाईक यांनी म्हटले आहे.

दोनदा वादाला फुटले तोंड

मंत्री राणे हे ‘पंचायत चलो’ अभियान संपल्यानंतर निघून गेले. त्यानंतर सुदिन ढवळीकर पुन्हा आरजी कार्यकर्त्यांसमोर आल्यानंतर पुन्हा एकदा दोन्ही गटांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी ढवळीकर यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रकरणी ‘आरजी’च्या कार्यकर्त्यांनी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांची कारवाई! सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

SCROLL FOR NEXT