Panjim MLA Babush Monserrate Dainik Gomantak
गोवा

बाबुश मोन्सेरात यांच्या अचानक निर्णयामुळे राज्यात उलटसुलट चर्चा

आजपासूनचा प्रचार अचानक मागे..

दैनिक गोमन्तक

पणजी: पणजीचे भाजप आमदार अतानासिओ ऊर्फ बाबुश मोन्सेरात (MLA Babush Monserrate) हे पणजीतून निवडणूक लढवणार असल्याने ते आज 10 रोजी श्री महालक्ष्मीचे दर्शन प्रचाराला अधिकृतपणे प्रारंभ करण्याची घोषणा केली होती. मात्र अजून भाजपने विधानसभेसाठी (Goa Assembly) उमेदवारांची यादी जाहीर न केल्याने त्यांनी ही घोषणा मागे घेतली आहे असे स्पष्टीकरण मोन्सेरात यांनी केले आहे. मात्र त्यांच्या या निर्णयामुळे पणजीत उलटसुलट सुरू झाली आहे. (sudden decision of Babush Monserrate sparked discussion)

हल्लीच पणजीत झालेल्या पणजी भाजप (Goa BJP) मंडळाच्या जाहीर सभेत भाजपने आमदार बाबुश मोन्सेरात (MLA Babush Monserrat) यांना पणजीतून उमेदवारी निश्‍चित झाल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे मोन्सेरात यांनी उमेदवारी यादीची पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाकडून घोषणा होण्यापूर्वीच कामाला सुरुवात करण्याचे ठरविले होते. त्यानुसार उद्या कार्यकर्त्यांना घेऊन श्रीमहालक्ष्मी मंदिरात जाण्याची तयारीही केली होती मात्र अचानक त्यांनी माघार घेतल्याने त्यांच्या या निर्णयाबाबत पुन्हा संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी तसेच ज्यांना उमेदवारी मिळण्याची खात्री आहे, त्यांनी यापूर्वीच प्रचाराला सुरुवात केली आहे तर आमदार मोन्सेरात यांनी माघार का घेतली आहे, असा प्रश्‍न चर्चिला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT