Dainik Gomantak Dainik Gomantak
गोवा

Success Story : पर्रामध्ये सेंद्रिय कलिंगडांचे पीक घेणारा शेतकरी ‘उद्देश’

चवीसाठी प्रसिद्ध : डिसेंबर-जानेवारीत लागवड; रस्त्याशेजारी विक्री

दैनिक गोमन्तक डिजिटल

Success Story : कलिंगड हे अत्यंत कमी कालावधीत, कमी खर्चात, जास्तीत जास्त नफा मिळवून देणारे वेलवर्गातले पीक. पौष्टिक फळ असल्याने त्याला उन्हाळ्यात भरपूर मागणी असते. आणि पर्रातील ही सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली गावठी कलिंगडे प्रसिद्ध आहेत, आपल्या चवीसाठी.

हे पीक अधिकतर वाळूमिश्रित जमिनीत घेतले जाते. मागील अनेक वर्षे कारास्कोवाडा-पर्रा येथील उद्देश पेडणेकर हा चाळीस वर्षीय तरुण शेतकरी आपल्या आईसोबत पर्रा येथे सेंद्रिय पद्धतीने गावठी कलिंगडाचे पीक काढतो आणि हातोहात रस्त्याशेजारी विक्रीसुद्धा करतो.

कलिंगडांची लागवड डिसेंबर-जानेवारीत करावी लागते म्हणजेच कलिंगडे ऐन उन्हाळ्यात एप्रिल-मेमध्ये बाजारात विक्रीसाठी तयार होतात. उद्देश पेडणेकर हा आपला उदारनिर्वाह याच व्यवसायातून चालवितो.

पीक आल्यानंतर तो थेट बाजारात कलिंगडांची विक्री करत नाही, त्याऐवजी आपल्या मळ्याशेजारी रस्त्यावर आईसोबत गाड्यावर बसून कलिंगडांची विक्री करतो. बाजारापेक्षा अशा पद्धतीने कलिंगडाला चांगला भाव मिळतो, असे उद्देश पेडणेकर सांगतो.

म्हापशापासून काही अंतरावर असलेल्या पर्रा गावात माजी संरक्षणमंत्री तथा गोव्याचे मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर जन्मले. त्या गावाची खासियत म्हणजे हीच चविष्ट कलिंगडे. पर्रीकर आपल्या भाषणातून अनेकदा या कलिंगडांची खासियत व किस्से सांगायचे. कलिंगडाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्मृतीही त्यांनी अनेकदा भाषणातून जागविल्या होत्या.

"कलिंगड हे तीन महिन्यांचे पीक असते. या पिकाला खर्च कमी व नफा जास्त असतो. मात्र, दरवर्षी फक्त उन्हाळ्यात हे पीक काढतो. नंतर पावसाळ्यात भातशेती व इतर भाज्यांचे पीक घेतो."

"ज्यामध्ये तांबडी भाजी, वाली, टोमॅटो, मका, कणगी, रताळी, मुळा, मिरची आदींचा समावेश आहे. या भाज्या व मिरची हे आपण फलोत्पादन मंडळाला विकतो. गेल्या वर्षी जवळपास शंभर किलो मिरचीचे पीक काढले. याशिवाय साळगाव, शिवोली, पर्रा तसेच अन्यत्र नांगरणीसाठी स्वतःची ट्रॅक्टर सेवा पुरवितो."

- उद्देश पेडणेकर, शेतकरी

अडीच ते आठ किलोपर्यंतची कलिंगडे

उद्देश पेडणेकर यांच्या मळ्यात अडीच ते आठ किलोपर्यंतची कलिंगडे आहेत. आठ किलोच्या कलिंगडांची किंमत ही 350 ते 400 रुपये, तर दोन ते अडीच किलोच्या कलिंगडाची प्रतिपन्नास रुपयांपर्यंत विक्री होते. दिवसा किमान पंचवीस कलिंगडांचे नग हातोहात विकले जातात.

पर्रामधील कलिंगडे गोवाभर प्रसिद्ध आहेत. येथील जवळपास शंभर कुटुंबीय सध्या हे पीक घेऊन हा वारसा चालवताहेत. मात्र, पीक काढणे तितके सोपे नाही. कारण मोर, गुरे यांच्यापासून या कलिंगड पिकाचे संरक्षण करावे लागते.

सध्या पर्रामधील अनेकजण कलिंगडचे पीक घेऊ लागलेत. मध्यंतरी ही संख्या कमी झालेली. मात्र, अशाप्रकारे लोक कलिंगडचे पीक घ्यायला लागल्यास भविष्यात फुसट झालेली ही पर्रा गावाची कलिंगडची ओळख नव्याने बहरेल, असा विश्वास उद्देश पेडणेकर यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT