Ship Union Territory Dainik Gomantak
गोवा

ग्रीक नागरिकाला वाचवण्यात यश; प्रकृती स्थिर

माहिती मिळताच सागरी बचाव समन्वयक केंद्र लागले तातडीने कामाला

दैनिक गोमन्तक

जहाजावरून समुद्रात पडलेल्या पापाडोपॉलस डोनिसिस या ग्रीक नागरिकाला, सागरी बचाव समन्वयक केंद्राने केलेल्या प्रयत्नामुळे दुसऱ्या मालवाहू जहाजाने शोध घेऊन सुखरुपपणे वाचवले. वैद्यकीय उपचारानंतर त्याची प्रकृती निरोगी व स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘गॅलिनी’ या मालवाहू जहाजावरील (Ship) अधिकारी डोनिसिस हे रविवारी( ता. 27) सकाळी पाण्यात पडल्यासंबंधी मुंबईच्या सागरी बचाव समन्वयक केंद्राचा संदेश भारतीय तटरक्षक दलाला मिळाला.

ही जहाज लक्षव्दिप केंद्रशासित प्रदेशाच्या अवत्ती बेटाच्या पश्र्चिमेला सुमारे 625 सागरी मैलावर होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तसेच समुद्रातील (sea) संकटग्रस्त नाविकांना मदत देण्याच्या भारतीय तटरक्षक दलाच्या आदेशाची पूर्तता करताना सागरी बचाव समन्वयक केंद्र तातडीने कामाला लागले.

’गॅलीनी’ या जहाजापासून अतिशय जवळ असलेल्या ‘बार्जन’ या मालवाहू जहाजाला शोध व बचाव प्रयत्नांना चालना देण्यासाठी तेथे वळवण्यात आले. जहाजाने शोध घेताना त्या अधिकाऱ्याला पाण्यात पाहिल्याची माहिती दिली. त्यानंतर ‘बार्जन’ जहाजावरील कर्मचाऱ्यांनी डोनिसिस याला सुखरुपपणे आपल्या जहाजावर आणले. सागरी बचाव समन्वयक केंद्राने सकरात्मक पाउल टाकून व भारतीय तटरक्षकाने आपले ब्रीदवाक्य खरे ठरवून मर्चंट मरिनचा विश्वास मिळवला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT