मेरसिआना वास, जॉन डीसा आपचे उमेदवारी अर्ज सादर करताना  Dainik Gomantak
गोवा

Goa Zilla Panchayat Election: कुठ्ठाळी मतदारसंघातून तीन उमेदवारांचे अर्ज सादर

कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास माजी आमदार एलिना साल्ढाना, काँग्रेसचे नेते ओलांसियो सीमॉईश यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर. आमदार आंतोनियो वास यांच्या पत्नीचा अर्ज सादर.

दैनिक गोमन्तक

वास्को: जिल्हा पंचायतीच्या 16 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या तीन मतदार संघातील पोटनिवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी कुठ्ठाळी मतदारसंघातून काँग्रेस, आप व कुठ्ठाळीचे आमदार आंतोतोनि वास, माजी आमदार एलिना साल्ढाना, पुरस्कृत उमेदवार मिळून तीन उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. कुठ्ठाळीचे आमदार आंतोनियो वास माजी आमदार एलिना साल्ढाना, काँग्रेसचे नेते ओलांसियो सीमॉईश यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज सादर. आमदार आंतोनियो वास यांच्या पत्नीचा अर्ज सादर.

(Goa Zilla Panchayat Election)

जिल्हा पंचायतीच्या तीन मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस होता. 16 ऑक्टोबरला या जिल्हा पंचायत पोटनिवडणुका दवर्ली, कुठ्ठाळी व रेईश मागुस या मतदारसंघात होणार आहे. दरम्यान दक्षिण गोव्यातील कुठ्ठाळी मतदारसंघातून सर्वप्रथम उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी रेव्हूलेशनरी गोवन्स (आरजी) या पक्षाच्या उमेदवारांने पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

दरम्यान आज सकाळी सादर करण्यात आलेल्या उमेदवारी अर्जात कुठ्ठाळीचे आमदार आंतोनिया वास यांच्या पत्नी मेरसियाना मेंडीज ई वाझ यांनी (अपक्ष) म्हणून उमेदवारी अर्ज सादर केला. तर अनिता सौझा (काँग्रेस), जॉन डीसा (आप), वालेंत बारबोजा (काँग्रेस) असे एकूण चार उमेदवारी अर्ज सादर करण्यात आले. निर्वाचन अधिकारी रवी शेखरनिपाणीकर यांनी उमेदवारी अर्ज स्वीकृत केले.

दरम्यान कुठ्ठाळी पोट निवडणुकीसाठी एकूण पाच अर्ज सादर करण्यात आले असून यात काँग्रेसचे दोन, अपक्ष, आम आदमी पार्टी व रेवल्यूशनरी गोवंन्स प्रत्येकी एक अर्ज सादर करण्यात आला. भाजपने मात्र कुठ्ठाळी मतदारसंघात आपला उमेदवार जाहीर केला नाही. आपल्या उमेदवाराचे अर्ज सादर करण्यासाठी त्यांच्या नेत्यांची उपस्थिती लक्षणीय ठरली. यात कुठाळीचे आमदार आंतोनिया वास, कुठाळीच्या माजी आमदार एलिना साल्ढाना, काँग्रेसचे नेते ओलांसयो सिमॉईश उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Fraud: फेक क्राईम ब्रँच ऑफिसर, 'डिजिटल अरेस्ट'ची धमकी अन् 42 लाखांवर डल्ला; भामट्याचा गेम ओव्हर, पोलिसांनी आवळल्या मुसक्या!

Menkure Gram Sabha clash: ग्रामसभेत पेटली स्मशानभूमी! लोकार्पणाच्या मुद्यावरून मेणकुरेवासीयांत धक्काबुक्की; खुर्च्याही उगारल्या

VIDEO: क्लबबाहेर दोन गटांत राडा! शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, 8 जण अटकेत; पाटो पणजीतील घटनेचा व्हिडिओ व्हायरल

Weather Update: गतवर्षीच्‍या तुलनेत पाऊस 28.43 इंचांनी कमीच, सरासरी पर्जन्यमानातील तूट अजूनही 30 टक्‍क्‍यांवर; हवामान विभागाचा निष्कर्ष

Amit Shah Goa visit: अमित शहा 6 सप्‍टेंबरला ठरविणार रणनीती; गोवा दौऱ्यामध्ये मंत्री, आमदारांसह गाभा समितीचीही घेणार बैठक

SCROLL FOR NEXT