Subhash Shirodkar Dainik Gomantak
गोवा

Subhash Shirodkar : रामसर यादीत समावेशामुळे नंदा तळे देशात प्रसिद्ध होईल... जलस्त्रोत मंत्र्यांचा विश्वास

जलस्रोतमंत्री शिरोडकर : 50 लाखांचा खर्च; राज्यातील पाहिली ‘रामसार जागा’

गोमन्तक डिजिटल टीम

केपे : राज्यातील पाहिली ‘रामसार जागा’ म्हणून घोषित केलेल्या काकोडा येथील नंदा तळ्याचे सुमारे पन्नास लाख रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येणार असून याठिकाणी आणखी सुविधा पुरविण्याचा जलस्रोत खात्याचा विचार असल्याचे जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले. काकोडा येथे नंदा तळ्याच्या सुशोभीकरण कामाच्या शुभारंभावेळी ते बोलत होते.

यावेळी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल, नगराध्यक्ष जास्मीन ब्रागांझा, नगरसेवक ऋचा वस्त, नगरसेवक प्रदीप नाईक, विश्वास सावंत देसाई, प्रसन्न भेंडे व इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रसिद्धी मिळणार

नंदा तळ्याचे सुशोभीकरण काम हाती घेतले आहे. आता येथे भेट देणाऱ्या पर्यटकांना याठिकाणी येणारे वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी पाहण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे तळे रामसार यादीत समाविष्ट झाल्याने फक्त देशातच नव्हे तर जगाच्या नकाशावर हे गाव आता प्रसिद्धीस पावणार आहे.

- सुभाष शिरोडकर, जलस्रोतमंत्री

नंदा तळ्याचे सुशोभीकरण काम हाती घेतल्याने येथे भेट देणाऱ्या लोकांसाठी एक चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत व जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांच्या सहकार्यामुळे आज ही जागा रामसार यादीत समाविष्ट झाली. येत्या काही दिवसांत आम्ही ओडिसा येथील रामसार यादीत समाविष्ट झालेल्या चिल्का तळ्याला भेट देण्यासाठी जात असून नंदा तळ्याला त्याचा काशाप्रकारे आम्ही फायदा करून घेऊ शकतो याचा अभ्यास करणार आहोत.

- नीलेश काब्राल, साबांखा मंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Scam करणाऱ्यांचा प्लॅन होईल फेल! WhatsAppची 'ही' सेटिंग ON करा, संशयास्पद मेसेजपासून आधीच मिळेल सावधानतेचा इशारा

बॉल की बुलेट...! पोलार्डला टाकला खतरनाक बाउन्सर, चेंडू थेट सीमारेषेपार; विकेटकीपर बघतच राहिला Watch Video

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा; निलंबनाची याचिका फेटाळली, ECI आणि कायदे मंत्रालयाला नोटीस!

ICC Fine India West Indies: T20 मालिकेपूर्वी भारत-वेस्ट इंडिजला 'आयसीसी'चा दणका; दोन्ही संघांना ठोठावला दंड, कारण काय?

Viral Video: देवदूत बनून आला 'कॉन्स्टेबल'! चालत्या ट्रेनमध्ये चढताना प्रवाशाचा गेला तोल अन्... जीवघेण्या अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

SCROLL FOR NEXT