Fishing industry Dainik Gomantak
गोवा

मत्स्योद्योग खात्याच्या योजनांचा लाभ घ्या: सुभाष गावकर

काणकोण तालुक्यातील विविध पंचायातीत जागृती

दैनिक गोमन्तक

काणकोण: काणकोण तालुक्याच्या विविध पंचायतीत रविवारी ‘आझादी का अमृत महोत्सव’ यानिमित्ताने पंचायतींच्या खास ग्रामसभा घेण्यात आल्या. या ग्रामसभांतून वेगवेगळ्या खात्याच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती देऊन मत्स्योद्योग खात्याचे सर्व्हेयर सुभाष गावकर यांनी लाभ घेण्याचे आवाहन केले.

पैंगीण पंचायतीच्या प्रभारी सरपंच एल्डा फर्नांडिस यांनी स्वागत केले. सचिव राजीव नाईक गावकर, पंच सरिता पागी, रुद्रेश नमशीकर उपस्थित होते. पंच रूद्रेश नमशीकर यांनी आभार मानले.

खात्यातर्फे मत्स्य व्यावसायिकांना मोटारबोट, पाती, जाळी घेण्यासाठी १ लाख ६० हजार रुपयांपर्यत कर्ज देण्यात येते. या कर्जाचे व्याज केंद्र व राज्य सरकारतर्फे फेडण्यात येते. म्हणजेच लाभधारकांना बिनाव्याज कर्ज उपलब्ध होत असल्याचे गावकर यांनी सांगितले. त्याशिवाय ‘बायो फोक’ या योजनेअंतर्गत मत्स्यपैदासीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. त्यासाठी चार मीटर व्यासाची टाकी उभारून चणक, मोरसो, कोळंबी यांची पैदास करता येते. त्यासाठीही खात्यातर्फे अनुदान देण्यात येत आहे. पंचायत क्षेत्रात मासळी मार्केटही खात्याकडून उभारण्याची योजना आहे. त्यासाठी पंचायतीने जागा उपलब्ध करून देऊन तसा प्रस्ताव खात्याकडे पाठवून देण्याची गरज आहे.

तळपण नदीचे मुख गाळाने भरल्याने मत्स्य व्यावसायिकांना बोटी समुद्रात सोडण्यास व धक्क्यावर आणण्यासाठी त्रास होत आहेत त्यासाठी नदीचे मुख गाळमुक्त करण्याचा प्रस्ताव आहे.मत्स्यव्यवसायासाठी अनुदानावर मत्स्योद्योग खात्याकडून बोटी घेऊन त्याचा उपयोग करण्यात येणार असल्याचे गावकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT