Goa MLA Ladakh Study Tour | Ramesh Tawadkar Dainik Gomantak
गोवा

Goa MLA Ladakh Study Tour: आमदारांचा लेह-लडाखचा अभ्यास दौरा झाला रद्द... सभापतींनी सांगितले 'हे' कारण

आमदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा अभ्यास दौरा रद्द करण्यात आला

Kavya Powar

Goa MLA Ladakh Study Tour: राज्यातील आमदार आणि मंत्र्यांचा येत्या 6 ते 10 सप्टेंबर या कालावधीत लेह लडाख येथे अभ्यास दौरा नियोजित करण्यात आला होता. यासाठी सभापती रमेश तवडकरांनी प्रस्ताव सादर केला असून इच्छुक आमदारांना याबाबत नोंदणी करण्यास सांगितले होते.

मात्र यासाठी आमदारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने हा अभ्यास दौरा रद्द करण्यात आला आहे. सभापती रमेश तवडकर यांनी मंत्र्यांसह आमदारांसाठी लेह लडाखच्या अभ्यास दौऱ्याचा प्रस्ताव ठेवला होता आणि अभ्यास दौऱ्याचा भाग होऊ इच्छिणाऱ्या आमदारांना 31 ऑगस्टपर्यंत त्यांची इच्छा व्यक्त करण्यास सांगण्यात आले होते.

याबाबत सभापती म्हणाले की, एकाही आमदाराने या दौऱ्यात स्वारस्य दाखवले नाही आणि त्यामुळे आम्ही तो तूर्तास रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रत्येक आमदाराच्या अगोदरच काही नियोजित भेटी, बैठका आणि इतर कामे होती. आमदारांकडून आम्हाला कोणतेही उत्तर मिळाले नाही, असे त्यांनी सांगितले.

पर्यावरण आणि पर्यटन तसेच इतर संबंधित क्षेत्रांचा विकास करण्यासाठी आमदारांना लेह, लडाखमधील विविध ठिकाणांना भेटी देण्यासाठी अभ्यास दौऱ्याचे नियोजन करण्यात आला होता. हा दौरा 10 सप्टेंबरला संपणार होता.

गुजरातमधील सुप्रशासन पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी या वर्षी फेब्रुवारीमध्ये असाच अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये नऊ आमदारांनी सहभाग घेतला होता.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा फॉरवर्ड पक्षाचे आमदार विजय सरदेसाई यांनी या दौऱ्यात सहभागी होण्यास नकार दिला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 19 October 2026: सुवर्णयोग आणि धनलाभाचा दिवस! शारदीय नवरात्रीच्या सोमवारी 'या' राशींचे उजळणार नशीब; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस?

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

SCROLL FOR NEXT