विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ Dainik Gomantak
गोवा

Goa: डिचोली शांतादुर्गा विद्यालयाच्या दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव

प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा डिचोलीचे (Bicholim) आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

डिचोली: डिचोलीतील विद्यावर्धक मंडळ संचलित श्री शांतादुर्गा विद्यालयाने दहावीच्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे. यंदा या विद्यालयाचा दहावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. बुधवारी आयोजित एका कार्यक्रमात प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांच्या उपस्थितीत गौरव करण्यात आला. (Students were felicitated in the presence of Dicholi MLA and Speaker Rajesh Patnekar)

याप्रसंगी विद्यावर्धक मंडळाचे अध्यक्ष विजय सरदेसाई,उपाध्यक्ष सदाशिव वालावलकर, खजिनदार राजेश धोंड, शांतादुर्गा उच्च माध्यमिकचे व्यवस्थापक अरुण साळकर, माध्यमिक विभागाचे व्यवस्थापक राजाराम चणेकर, साधनसुविधा विकास विभागाचे व्यवस्थापक दिनेश मयेकर, क्रीडा अकादमीचे व्यवस्थापक अभिजित तेली, समाजसेवक तथा निवृत्त शिक्षक दीनानाथ तारी, मुख्याध्यापिका श्रद्धा आसकावकर, शिक्षिका यास्मिन शेट्ये आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान, या सोहळ्यात सोनल महेश कारेकर, मैत्रेयी राकेश बांदेकर, अमेय वैकुंठ कापडी, स्वरा प्रशांत ठक्कर आणि श्रुष्टी सिद्धार्थ चोडणकर या प्रथम आलेल्या पाच विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.सभापती पाटणेकर यांनी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखल्याबद्दल विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. कोरोना संकटामुळे गोवा शालांत शिक्षण मंडळाने यंदा दहावीच्या परीक्षा रद्द करून प्रत्येक हायस्कुलमध्ये निकाल समिती स्थापन करून अंतर्गत मूल्यांकनाव्दारे दहावीचा निकाल तयार केला आहे. या हायस्कुलमधून सर्व 263 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT