डिचोलीत अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी गर्दी Dainik Gomantak
गोवा

डिचोलीत अकरावी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी गर्दी

अन्य शाखांनी जागा 'फूल्ल', अनेक विद्यार्थी प्रवेश प्रतीक्षा यादीत

दैनिक गोमन्तक

डिचोली: यंदा दहावी निकालाच्या वाढलेल्या टक्केवारीमुळे अकरावी प्रवेशासाठी (Admission) गर्दी झाल्याने डिचोलीतील (Bicholim) विविध उच्च माध्यमिक विद्यालयांसमोर पेच निर्माण झाला आहे. यंदा 10 ते 15 टक्के जागा वाढविण्यास विद्यालयांना शिक्षण खात्याने मान्यता दिली असतानाही, तालुक्यातील विद्यालयांनी कला आणि वाणिज्य शाखेत जागा जवळपास 'फूल्ल' झाल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असल्याचे समजते. (Students thronged for admission to eleventh science branch in Bicholim)

दुसऱ्या बाजूने विज्ञान शाखेत प्रवेशासाठी गर्दी झाल्याचे आढळून येत आहे. गोवा राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या 'सीईटी' (CET) परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर कालपासून (मंगळवारी) अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे.

डिचोली तालुक्यात श्री शांतादुर्गा विद्यालय (डिचोली), सरकारी विद्यालय (साखळी), विविधा विद्यालय (न्हावेली), सिद्धार्थ बांदोडकर विद्यालय (वेळगे), विजयानंद विद्यालय (तिखाजन-मये) आणि ज्ञानविकास विद्यालय (मुळगाव) अशी सहा उच्च माध्यमिक विद्यालये आहेत.

विज्ञान शाखेसाठी गर्दी

विज्ञान शाखेची सोय असलेल्या डिचोलीतील श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयासह, साखळीच्या सरकारी आणि न्हावेलीच्या विविधा उच्च माध्यमिक विद्यालयात विज्ञान शाखेत अकरावीसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. विज्ञान शाखेत प्रवेशासाठी या विद्यालयांतून गर्दी झाली आहे. तालुक्यातील एक मोठी शिक्षण संस्था असलेल्या डिचोलीतील शांतादुर्गा विद्यालयात तर दरवर्षीप्रमाणे यंदाही अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्यासाठी संख्या वाढलेली आहे. सद्यस्थितीत या विद्यालयात 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेशासाठी अर्ज भरले आहेत. सीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या आपल्या मुलांना विज्ञान शाखेत प्रवेश मिळावा, म्हणून काही पालकांची धडपडही सूरू आहे. मात्र सीईटी परीक्षेत पडलेल्या गुणांच्या निकषावरच विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश देण्यात येणार आहे.

शांतादुर्गात 'फूल्ल

विद्यावर्धक मंडळ संचलित डिचोलीच्या श्री शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयात अकरावीच्या विविध शाखांनी मिळून 600 जागा उपलब्ध आहेत. शिक्षण खात्याने 15 टक्के जागा वाढविण्यास मान्यता दिली आहे. तांत्रिक अडचण पाहता हा आकडा 720 करण्यात येणार आहे. तरीदेखील समस्या निर्माण होणार आहे. यंदा अकरावीच्या विविध शाखांनी मिळून 1 हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश नोंदणी केली आहे. त्यामुळे त्यातील जवळपास 300 विद्यार्थ्यांना प्रवेश देणे शक्य होणार नाही. विज्ञान शाखेतच 300 हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज भरले आहेत. विज्ञान शाखेत 200 जागा उपलब्ध आहेत. त्यात 15 ते 20 जागा वाढविणे शक्य आहे.

-विजय सरदेसाई, अध्यक्ष, विद्यावर्धक मंडळ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT