Chandrakant Shetye News Dainik Gomantak
गोवा

आत्मविश्वासाच्या बळावर विद्यार्थ्यांनी ध्येयप्राप्ती करावी: चंद्रकांत शेट्ये

ज्ञानप्रकाशतर्फे मुळगावात आमदारांचा सत्कार

दैनिक गोमन्तक

डिचोली: कठोर परिश्रम आणि आत्मविश्वासाच्या बळावर निश्चित ध्येय पादाक्रांत करता येते. विद्यार्थ्यांनी याचा विचार करून आत्मविश्वास आणि मेहनत घेऊन आपल्या आवडीच्या क्षेत्रात नाव कमवावे, असे आवाहन डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले. मुळगाव येथील ज्ञानप्रकाश उच्च माध्यमिक विद्यालयाच्या बक्षीस वितरण समारंभात डॉ. शेट्ये प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. याप्रसंगी ज्ञानप्रकाश शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री पांडुरंग राऊत, प्राचार्य सेलिना डिमेलो, ज्ञानेश्वर कळंगुटकर, लक्ष्मीकांत परब आदी उपस्थित होते.

याप्रसंगी ज्ञानप्रकाश मंडळातर्फे माजी मंत्री पांडुरंग राऊत यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. शेट्ये यांनी ज्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे, त्यात यश प्राप्त केले आहे, असे गौरवोदगार श्री. राऊत यांनी यावेळी काढले. प्राचार्य डिमेलो यांनी स्वागत केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

डिचोलीत दिवाळीचा उत्साह शिगेला! नरकासुर प्रतिमांनी वेधलं लक्ष; बाजारपेठेत खरेदीसाठी प्रचंड गर्दी

Viral Video: ट्रेनमध्ये चोरी करायला गेला अन् स्वतःच अडकला! खिडकीतून हात घालताच प्रवाशांनी चोराला पकडलं; 94 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल

Accident Death: तन्मयची दिवाळी ठरली अखेरची! डिचोलीत भीषण अपघातात 22 वर्षीय युवकाचा मृत्यू

VIDEO: दिलदार केएल राहुल! सामना संपल्यानंतर महिला कर्मचाऱ्याला दिलं सरप्राईज; महागडा फोन केला गिफ्ट

Bicholim: डिचोली मंदिर परिसरात कोसळली झाडाची फांदी, अनर्थ टळला; वीजखांब मोडला, अडीच तास वीजपुरवठा खंडित

SCROLL FOR NEXT