School Gathering Dainik Gomantak
गोवा

School Gathering: स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थी बनतात धीट

प्रा. सुलक्षणा सावंत ः आमोणे शाळेचे बक्षीस वितरण

गोमन्तक डिजिटल टीम

आमोणे गावात प्राथमिक, माध्यमिक विद्यालयात शिकणारे बहुतांश विद्यार्थी, शिक्षणात, खेळात, कलेत नेहमीच प्रावीण्य मिळवत असून हा वारसा पुढेही असाच विद्यार्थ्यांनी चालू ठेवावा. गावातील चारही विद्यालयांतील स्नेहसंमेलनांचा पालक व ग्रामस्थांचा येथे उत्स्फूर्त प्रतिसाथ असून खरे तर स्नेहसंमेलन, बक्षीस वितरण व इतर स्पर्धेच्या कार्यक्रमाने विद्यार्थी धीट बनतात, असे प्रतिपादन गोवा भाजपा प्रभारी प्रा. सुलक्षणा सावंत यांनी केले.

सरकारी प्राथमिक विद्यालय, भंडारवाडा व पालक- शिक्षक संघ यांच्यातर्फे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण कार्यक्रमात सावंत प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर पाळी जिल्हा पंचायत सदस्य गोपाळ सुर्लकर, स्थानिक सरपंच कृष्णा गावस, पंच अनिशा आमोणकर, वासुदेव घाडी, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास गावकर, माजी मुख्याध्यापक गोविंद नाईक, वेदान्ता कंपनीचे अधिकारी मिलींद बर्वे, विद्यालयाचे मुख्याध्यापक संजय परब व पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नंदेश नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.

नंदेश नाईक यानी मान्यवरांची ओळख, स्वागत व त्यांना पुष्पगुच्छ प्रदान केल्यावर मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलित करण्यात आली. यावेळी संजय परब यांनी विद्यालयाचा वार्षिक अहवाल सादर केला.नंतर विद्यालयात आयोजित खेळ व इतर स्पर्धांत प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना व पालकांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे वितरण कार्यक्रम झाला.

गोविंद नाईक, कृष्णा गावस व गोपाळ सुर्लकर या मान्यवरांनी यावेळी विद्यार्थ्यांचे कौतुक करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. शेवटच्या सत्रात विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलनात विविध प्रकारची, विविध भाषेतील नृत्ये, एकपात्री अभिनय करून उपस्थितांकडून टाळ्या घेतल्या. सूत्रनिवेदन सुशांती मांद्रेकर यांनी केले. सर्वेश नाईक यांनी आभार मानले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

VIDEO: विराट कोहलीला चाहत्याने अचानक दाखवला बूट; काही क्षण गोंधळला, मग असा होता रिअ‍ॅक्शन! व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 7-8 ऑक्टोबरला बंगळुरूत 8व्या वेतन आयोगाची बैठक; पगार, पेन्शन आणि फिटमेंट फॅक्टरवर मंथन

Coal Transportation: कोळसा वाहतुकीला वेग; सहा महिन्यांत 11.4 टक्के वाढ, दक्षिण पश्चिम रेल्वेची 5.36 दशलक्ष टन वाहतूक

Cyber Fraud Alert: ना ऑर्डर, ना पेमेंट… तरी घरी आलं पार्सल! चुकूनही सांगू नका OTP; सायबर ठगांचा नवा फंडा, एका चुकीने रिकामं होऊ शकतं खातं!

Mango Tree Fall: आंब्याची महाकाय फांदी अचानक कोसळली; चार वाहनांचे मोठे नुकसान, सुमारे 5 लाखांचा फटका

SCROLL FOR NEXT