Bambolim Goa 
गोवा

Goa Crime News: कुजिरा शैक्षणिक संकुलात विद्यार्थ्यांवर चाकूहल्ला; तिघांच्‍या मुसक्‍या आवळल्‍या

Goa Crime News: भांडणाचे रुपांतर चाकू हल्ल्यात झाल्याने बांबोळी येथील कुजिरा शैक्षणिक संकुलात खळबळ उडाली.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Crime News

भांडणाचे रुपांतर चाकू हल्ल्यात झाल्याने बांबोळी येथील कुजिरा शैक्षणिक संकुलात खळबळ उडाली. सकाळी ११ ते दुपारी १२.३० यादरम्यान घडलेल्‍या या प्रकरणात झाकुल्ला काजी याने जय कोल्ही याच्यावर चाकूने हल्ला करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

घटनेची माहिती मिळताच आगशी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संध्‍याकाळी उशिरा संशयित झाकुल्ला काजी, ज्‍योशुआ झेवियर (दोघेही रा. करंझाळे) आणि शोएब बेग (ताळगाव) या तिघांना फोंड्यातून उचलले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धेंपे महाविद्यालयाचा विद्यार्थी एडन फर्नांडिस (२०, ताळगाव) याच्या तक्रारीनुसार वरील तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. ज्योशुआ झेवियर आणि शोएब बेग या दोघांनी एडन आणि त्याचा मित्र जय कोल्ही यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

तसेच झाकुल्ला काजी याने मयंक चव्हाण याला बुक्‍क्‍यांनी मारहाण केली. तसेच चंद्रप्रकाश महाबर याला धक्का देऊन खाली पाडले. त्यात तो जखमी झाला.

प्रकरण वाढल्याने तक्रारदारांचा मित्र शिवेश नाईक हा त्यांच्या मदतीला आला असता, त्याच्या हाताला आणि पायाला जखम झाली. झाकुल्लाने चाकूने जय कोल्ही याच्‍यावर हल्ला करण्‍याचा प्रयत्‍न केला, परंतु कोल्हीने तेथून पळ काढून आपला जीव वाचवला.

तक्रारदार हे धेंपे विद्यालयाचे विद्यार्थी!

एका व्यक्तीने हातात चाकू घेऊन दहशत निर्माण केली व धिंगाणा घालून विरोधी गटाला शिवीगाळ केल्याचा ​व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्‍यामुळे सर्वत्र खळबळ माजली. पणजीचे डीवायएसपी सुदेश नाईक आणि आगशीचे पोलिस निरीक्षक सुलेखा अग्रवाल यांनी संध्‍याकाळी या प्रकाराबाबत मीडियाला संबोधित केले. दरम्‍यान, तक्रारदार हे धेंपे विद्यालयाचे विद्यार्थी असल्‍याचे समजते.

किरकोळ वादातून काढला राग : आदल्या दिवशी तक्रारदार एडन फर्नांडिस आणि जोशुआ झेवियर यांच्यात वाद झाला होता. त्‍याचा राग मनात ठेवून आज जोशुआ झेवियर, शोएब बेग आणि झाकुल्ला काझीर कुजिरा येथे आले आणि त्यांनी तक्रारदाराला शिवीगाळ केली. तसेच तक्रारदारचा मित्र जय कोहली, मयंक चव्हाण व चंद्रप्रकाश महाबर यांना मारहाण केली. त्‍यामुळे त्‍यांना दुखापत झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT