Goa Stray Dog Dainik Gomantak
गोवा

Goa Stray Dog: भटक्या कुत्र्यांसाठी कुडका येथे निवारा! पणजी महापालिकेला न्यायालयाचा मोठा आदेश

Goa High Court Stray Dog Order: वर्ष २०२१ पासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पणजी महानगरपालिकेला तातडीने पूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी कुडका येथे अखेर निवारा शेड उभारण्याचा मार्ग मोकळा होत आहे. वर्ष २०२१ पासून प्रलंबित असलेल्या या प्रस्तावाबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पणजी महानगरपालिकेला तातडीने पूर्ण आराखडा सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

बुधवारी झालेल्या सुनावणीदरम्यान पणजी महानगरपालिकेने न्यायालयात माहिती दिली की, कुडका येथे या निवाऱ्यासाठी १,५०० चौरस मीटरची जागा निश्चित करण्यात आली आहे. ही जमीन महानगरपालिकेच्याच मालकीची असून, येथे यापूर्वी भटक्या कुत्र्यांसाठी शेड बांधण्याचा विचार झाला होता.

महानगरपालिकेतर्फे या भटक्या कुत्र्यांच्या निवारा शेडचा संपूर्ण अंतिम आराखडा आगामी सुनावणीत न्यायालयात सादर केला जाणार आहे. महानगरपालिकेने स्पष्ट केले की, पूर्वी घेतलेल्या परवानग्यांची मुदत आता संपुष्टात आली आहे. त्यामुळे नगरनियोजन विभाग आणि कुडका ग्रामपंचायतीकडून नव्याने ना-हरकत दाखले व परवानग्या घ्याव्या लागणार आहेत. या पार्श्वभूमीवर न्यायालयाने आजच्या सुनावणीत कुडका पंचायतीला नव्याने प्रतिवादी करून घेतले आहे.

प्रतिज्ञापत्र सादर

सुनावणीदरम्यान केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने न्यायालयात आपले प्रतिज्ञापत्र सादर केले. केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या राज्यातील राष्ट्रीय महामार्गांचे व्यवस्थापन राज्य सरकारच पाहते आणि त्यासंबंधीचे सर्व अंतिम अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांचे आहेत, असे मंत्रालयाने प्रतिज्ञापत्रात स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Consumer Commission: मुदतवाढ नाकारल्याने दक्षिण गोवा ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष कोर्टात! 'अन्याय’ झाल्याचा केला दावा

Teachers Pending Salary: 458 शिक्षक-कर्मचाऱ्यांचा थकीत पगार कधी मिळणार? सरदेसाईंचं मुख्य सचिवांना पत्र; तात्काळ वेतनाची केली मागणी

Curchorem Drug Capital Goa: कुडचडे गोव्याचं 'ड्रग कॅपिटल'? अमित पाटकरांचा सरकारवर हल्लाबोल; अमली पदार्थांविरोधात निर्णायक कारवाईची केली मागणी

Viral Video: भरधाव राजधानी एक्सप्रेस अन् समोर हत्तींचा कळप! देवदूत बनून आला वन रक्षक; थोडक्यात काळाचा घाला टळला

ISRO Space Sector Reforms: 'इस्रो'चं खासगीकरण नाही, तर जबाबदारीचं नव्यानं वाटप! 2020 नंतर स्पेस इकॉनॉमीला वेग; नव्या अवकाश धोरणानं बदलली भारताची दिशा

SCROLL FOR NEXT