gas cylinders Dainik Gomantak
गोवा

फातोर्डात खुल्या जागेत गॅस सिलिंडरची साठवणूक

प्रशासनाची डोळेझाक: हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप असल्याने दुर्घटनेचा धोका

दैनिक गोमन्तक

मडगाव: आगाळी फातोर्डा येथे पूर्व बगल रस्त्याजवळ आदर्श चोदणकर रेसिडेन्सी आहे. या निवासी प्रकल्पाच्या खुल्या जागेत बेकायदेशीररित्या मोठ्या प्रमाणावर गॅस सिलिंडर एका वाहनात घालून साठवून ठेवण्यात आलेत. येथून अवघ्या शंभर मीटर अंतरावर पेट्रोल पंप असून त्यामुळे सिलिंडर साठवून ठेवणे म्हणजे आपत्तीला आमंत्रण देण्यासारखे आहे. या संबंधी प्रकल्पातील रहिवाशांनी पोलिस आणि प्रशासन या दोघांकडेही तक्रार करूनही त्याकडे फक्त डोळेझाक होत आहे.

कारवाई नाहीच: जागेपासून अवघ्या 200 मीटर अंतरावर फातोर्डा पोलीस स्थानक आहे. या संबंधात तक्रार करून दोन महिने उलटूनही कारवाई न झाल्याचा आरोप नागरिकांनी केला.

निवासी वस्तीत परवानगी दिलीच कशी?

पूर्वी इमारतीच्या तळमजल्यावर एका उद्योजकाचा गाड्यांचे शोरूम व गॅस बुकिंग कार्यालय सुरू होते. पण बँकेने 2021 मध्ये या ठिकाणी सील ठोकले. यानंतर त्या व्यावसायिकाने इमारतीसमोरील उघड्या जागेत व्यवसाय सुरू केला. येथे एक वाहन पार्क करून त्यात शेकडो गॅस सिलिंडर साठवून ठेवले जातात. निवासी प्रकल्पाच्या समोर ज्वालाग्राही पदार्थ साठवण्याची परवानगी कशी दिली गेली असा सवाल उपस्थित होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT