Goa Cattle Dainik Gomantak
गोवा

Illegal Cattle Slaughter Goa : 'गोवंशांची कत्तल थांबवा, अवैध कत्तलखाने बंद करा'; गोवंश रक्षा अभियानाची गोवा सरकारकडे मागणी

Goa Beef Market: गोवा मांस संकुलात बैलांच्या कत्तलीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी करावी, अशी CM सावंत यांच्याकडे मागणी.

Pramod Yadav

Stop cattle slaughter in Goa

पणजी: गोवंशांची होणारी कत्तल थांबवा आणि बेकायदेशीरपणे सुरु असणारे कत्तलखाने बंद करा, अशी मागणी गोवंश रक्षा अभियानाची गोवा सरकारकडे केली आहे. गोमा मांस संकुलात होणारी गोवंशाची कत्तल बंद करुन शेजारच्या राज्यातून येणारे बेकायदेशीरपणे गोमांस थांबवण्याची मागणी अभियानाने केली आहे.

गोवंश रक्षा अभियानाच्या वतीने आझाद मैदान, पणजी येथे पत्रकार परिषद घेण्यात आली. गोवा मांस संकुलात कायदेशीर कत्तल चालते असा सांगितले जाते. पण, २०१३ साली संकुलात बेकायदेशीरपणे कत्तलीसाठी वासरे आणली होती, असा संशय आहे. याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने वासरांच्या कत्तलीवर बंदी घातली, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष हनुमंत परब यांनी दिली.

गोवा मांस संकुलात बैलांच्या कत्तलीवर बंदी घालणारी अधिसूचना जारी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे केल्याची माहिती परब यांनी यावेळी दिली. कर्नाटकातून मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर गोमांत गोव्यात आयात केले जाते. याबाबत सीमेवर अधिकारी तैनात करुन कारवाई करण्याची मागणी देखील परब यांनी केलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Murder Trial: मांगोरहिल - वास्को खून प्रकरणात अझीम शेख दोषी; सोमवारी काय सुनावली जाणार शिक्षा?

Goa Live News: 'आप राजकारण करतंय, त्यांना सांत आंद्रे मतदारसंघात प्रवेश करायचाय'; वीरेश बोरकर

'कौशल्याधारित हरित रोजगार भविष्याची गरज'; आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या संचालक मिचिको मियामोतो

Margao Court: मतिमंद युवतीवर गेस्ट हाऊसमध्ये सामूहिक लैंगिक अत्याचार; शाहजाद शेखचा जामीन फेटाळला

गोव्याला स्वच्छतेचा दुहेरी मान! पणजीसह साखळीला थेट दिल्लीत पुरस्कार; आरोग्यमंत्र्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव

SCROLL FOR NEXT