Bombay HC At Goa Dainik Gomantak
गोवा

कालेतील खनिज वाहतूक येत्या मंगळवारपर्यंत बंद; गोवा फाऊंडेशनच्या याचिकेवर कोर्टाची अंतरीम स्थगिती

भगवान महावीर अभयारण्य क्षेत्रात खनिजाची चढउतार करण्यास या याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Bombay HC At Goa: काले रेल्वे स्थानकावर रेल्वेद्वारे आयात केलेल्या खनिज उतरण्यास आणि तेथून ते भरण्यास मुंबई उच्च न्यायालयाने 23 जानेवारीपर्यंत बंदी घातली आहे. तेथील या कृतीस आक्षेप घेणारी गोवा फाऊंडेशनने सादर केलेल्या याचिकेवर न्यायालयाने अंतरीम स्थगिती दिली आहे.

भगवान महावीर अभयारण्य क्षेत्रात खनिजाची चढउतार करण्यास या याचिकेत आक्षेप घेण्यात आला आहे.

या याचिकेवरील पुढील सुनावणी येत्या मंगळवारी 23 जानेवारीला होणार आहे. तोवर हा अंतरिम आदेश लागू राहील. मंगळवारी याचिकादाराच्या मागणीनुसार अंतरिम दिलासा देण्यासाठी न्यायालय खटल्याची सुनावणी करणार आहे.

न्या. एम.एस. सोनक आणि न्या. वाल्मकी मिनेझीस यांच्या खंडपीठाने या आदेशाद्वारे रेल्वेला पुढील खनिज माल आणण्यास आणि कंत्राटदाराला आधीच उतरवलेले खनिज काढण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

गोवा फाऊंडेशनने दाखल केलेल्या जनहित याचिकेवर आज प्राथमिक सुनावणी झाली. त्यवेळी याचिकादारांनी वन्यजीव कायदा, 1972 मधील अनेक तरतुदी लक्षात घेऊन अशा प्रकारच्या खनिजाची चढ उतार वन्यजीव अभयारण्यात करता येणार नाही, असा युक्तिवाद करण्यात आला. त्यानंतर मंगळवारपर्यंत जैसे थे परिस्थिती ठेवण्याचा आदेश जारी करण्यात आला आहे.

अभयारण्य क्षेत्रात खनिज चढउतारावर आक्षेप

सदर जनहित याचिका दक्षिण पश्चिम रेल्वेच्या काले रेल्वे स्थानकाच्या स्टेशन मास्टरद्वारे सांगे तालुक्यातील काले गावात भगवान महावीर वन्यजीव अभयारण्यात सुरू असलेल्या खनिज उतरवणे आणि चढवणे या कृतीला आव्हान देण्यासाठी दाखल करण्यात आली आहे.

याचिकेत म्हटले आहे, की वन्यजीव अभयारण्यात अशी कोणतीही क्रिया करण्यास प्रतिबंध आहे. ती कृती वन्यजीवांच्या चांगल्या व्यवस्थापनाच्या हिताची नाही.

अभयारण्याच्या मुख्य वन्यजीव संरक्षकाची पूर्व संमती वन्यजीव संरक्षण कायदा, 1972 च्या कलम 27,28,29 आणि 33 नुसार अभयारण्यातील कोणत्याही कृतीसाठी आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT