Dainik Gomantak
गोवा

Goa News: शिवरायांचा पुतळा अजूनही मडगाव पोलिस स्‍थानकात!

Goa News: शिवरायांचा पुतळा अजूनही मडगाव पोलिस स्‍थानकात!दोन गटांत जाणवतोय समन्‍वयाचा अभाव

दैनिक गोमन्तक

Goa News: शिवजयंतीनिमित्त येथे काढण्‍यात आलेली मिरवणूक संपल्‍यानंतर चित्ररथातील शिवाजी महाराजांचा पुतळा कुठे ठेवावा, यावर वाद होऊन ‘शिवसाम्राज्‍य’ आणि ‘राजे बॉईज्‌’ हे दोन गट एकमेकांना भिडले होते. त्‍यानंतर पुतळा मडगाव पोलिसांनी ताब्‍यात घेतला.

हा पुतळा नेमका कुठे नेऊन ठेवावा यावर दोन्‍ही गटांची एकवाक्‍यता न झाल्‍याने अजून तरी तो मडगाव पोलिस स्‍थानकाच्‍या आवारातच आहे.

दोन्‍ही गटांना आज पोलिसस्‍थानकावर बोलावून याप्रश्‍‍नी सामंजस्‍याने तोडगा काढण्‍याचा प्रयत्‍न झाला. ‘शिवसाम्राज्‍य’ गटाला हा पुतळा पूर्वीप्रमाणे हाऊसिंग बोर्डमधील ऋषीरंभा मंदिरात नेऊन ठेवायचा होता, मात्र दुसऱ्या गटाचा त्‍यास विरोध होता.

त्‍यामुळे दोन्‍ही गटांचे सदस्‍य पदाधिकारी असलेल्‍या श्री घोगळेश्‍‍वर मंदिरात हा पुतळा ठेवावा असा पर्याय पुढे आला. मात्र ‘राजे बॉईज्‌’ यांनी यासंबंधीचा आपला निर्णय नंतर कळवितो असे सांगितल्‍याने हा प्रश्‍‍न लोंबकळला आहे.

दोन्‍ही गटांना बोलावून त्‍यांच्‍याशी चर्चा केली. त्‍यातून शिवाजी महाराजांचा पुतळा त्रयस्‍थ ठिकाणी ठेवावा अशी सूचना पुढे आली. उद्या सकाळपर्यंत यावर अंतिम तोडगा निघेल अशी आशा आहे.
- संतोष देसाई, पोलिस उपअधीक्षक (मडगाव)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT