Pramod Sawant|Track Center Dainik Gomantak
गोवा

वाहतूक कोंडी आणि वाढत्या अपघातांवर 'ट्रॅक' ठेवणार लक्ष; २४ तास असणार पोलिस तैनात

Pramod Sawant: वाहतूक कोंडी व अपघातांवर नियंत्रण ठेवणाऱ्या ट्रॅक केंद्राचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Track Center

पणजी: राज्यातील वाढणारी वाहतूक कोंडी व अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वाहतूक पोलिस विभागातर्फे ‘गुगल मॅप’ व ‘ड्रोन’ची मदत घेऊन ‘ट्रॅक’ हे केंद्र स्थापन केले आहे. या केंद्राचे उद्‍घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

मद्यधुंद होऊन गाडी चालवणे गोमंतकीयांनी बंद करून स्वतःमध्ये सुधारणा आणावी. रस्त्यावरील इतरांचाही जीव महत्वाचा असतो हे ध्यानात ठेवावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

आल्तिनो - पणजी येथील वाहतूक पोलिस विभागाच्या कार्यालयात आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला पोलिस महासंचालक अलोक कुमार, महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई, अधीक्षक राहुल गुप्ता व वाहतूक संचालक पी. अभिषेक उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, की राज्यात प्रत्येक दिवशी एकाचा अपघातात मृत्यू होत आहे. त्यातील बहुतेक ५० टक्के अपघात हे स्वयंअपघात असतात. मद्यधुंद वाहनचालकांच्या हलगर्जीपणामुळे निष्पापांचा जीव जातो.

त्यामुळे राज्यात या नव्या स्थापन करण्यात आलेल्या ‘ट्रॅक’मुळे वाहतुकीची कोंडी झाल्यास ती सोडवण्यास मदत होणार आहे तसेच अपघातांवरही नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे. यासाठी पोलिस गुगल मॅप, ड्रोन तसेच सोशल मीडियाची मदत घेणार आहेत. त्याचा फायदा वाहतुकीची कोंडी सोडवण्यास होईल. त्याशिवाय अपघातप्रवण क्षेत्राचा शोध घेणे शक्य होणार आहे.

‘ट्रॅक’ काय करणार?

या केंद्रात २४ तास पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आलेले असतील.

गुगल मॅपवर वाहतुकीची कोंडी दिसल्यावर त्या भागातील पोलिस निरीक्षकाला या केंद्राकडून माहिती देण्यात येईल.

सोशल मीडियावर वाहतूक कोंडीचे व्हिडिओ वा छायाचित्रे आढळून आल्यास त्याची दखल या विभागामार्फत घेतली जाईल.

पोलिस स्थानक निरीक्षक वा वाहतूक निरीक्षकाला दिलेल्या माहितीनंतर त्याच्या पुढील कारवाईची व वेळेचीही नोंद ठेवली जाणार आहे, असे या ‘ट्रॅक’ केंद्रासंदर्भात माहिती देताना वाहतूक पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.

परिणामकारक रिल्सधारकांना बक्षिसे

यावेळी वाहतूक नियमांचे पालन न केल्यास होणारे परिणाम यासंदर्भातच्या ‘रिल्स’ मागवण्यात आल्या होत्या. त्यातील चार सर्वोत्तम रिल्स पाठवणाऱ्यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. त्यामध्ये ब्रँडन डिसोझा, समीर कायसूवकर, विराज फडते व श्रद्धा शिरोडकर यांचा समावेश होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विजेत्या रिल्सधारकांना राज्यातील विविध विषयांवरही रिल्स तयार करावेत व त्या सोशल मीडियाद्वारे लोकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM SVANidhi Scheme: स्टॉल चालवणाऱ्यांसाठी मोदी सरकारचं गिफ्ट! आता मिळणार 'इतक्या' हजारांच्या विनाहमी लोनसह खास कार्ड; पीएम स्वनिधी योजनेचा धमाका

POK News: "आम्हाला फसवलं गेलं...!", पाकिस्तानी लष्कराच्या भूमिकेवर POK मधील आंदोलक संतप्त; 21 जुलैपर्यंतचा दिला अल्टिमेटम

EPFO Interest: करोडो पगारदारांसाठी आनंदाची बातमी! ईपीएफओने व्याजाचे पैसे खात्यात पाठवण्यास केली सुरुवात; असे चेक करा

Viral Video: हातात काठी, जमिनीवर पडलेला माणूस अन् थरकाप उडवणारे दृश्य, भर रस्त्यात बाईकस्वारासोबत घडला अजब प्रकार; अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Gold Silver Price: लग्नसराईपूर्वी ग्राहकांना मोठे गिफ्ट! सोने आणि चांदी एकाच वेळी झाले स्वस्त; पाहा आजचे ताजे दर

SCROLL FOR NEXT