Pramod Sawant  Dainik Gomantak
गोवा

Goa Eco-Sensitive Area: १०८ गावे समाविष्ट करण्याच्या अधिसूचनेला राज्याचा आक्षेप; केंद्राशी पत्रव्यवहार करणार

Goa Eco Sensitive Zone: ठरविलेल्या निकषांच्या आधारे गावे वगळण्याची मागणी, ६३ गावे सूचित करावीत; मुख्यमंत्री

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने राज्यातील जैवसंवेदनशील विभाग ठरविताना काही त्रुटी राहिल्याचे यापूर्वी केलेल्या चर्चेत मान्य केले होते. ही एकमेव आशा राज्य सरकारला जैवसंवेदनशील विभागातून ४५ गावे वगळण्याची मान्य होण्यासाठी पुरेशी वाटत आहे. केंद्र सरकारने राज्यातील १०८ गावे जैवसंवेदनशील विभागात समाविष्ट करण्यासाठी अधिसूचनेचा मसुदा प्रसिद्ध केला असून त्याला राज्य सरकार पुन्हा आक्षेप घेणार आहे.केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेत नमूद

केंद्र सरकारच्या पर्यावरण खात्याने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप अधिसूचनेत नमूद असलेल्या राज्यातील १०८ गावांपैकी केवळ ६३ गावे ‘जैवसंवेदनशील विभागातील गावे’ म्हणून सूचित करावीत, यासाठी राज्य सरकारने जोरदार प्रयत्न करण्याचे ठरविले आहे. यासाठी राज्य सरकार आता पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या या मसुदा अधिसूचनेच्या प्रती पंचायती आणि संबंधित आमदारांना उपलब्ध करून देणार आहे.

यापूर्वी जुलै २०२२ मध्ये पर्यावरण खात्याने अशीच मसुदा अधिसूचना प्रसिद्ध केली होती आणि त्यात राज्यातील ९९ गावांचा जैवसंवेदनशील विभागात समावेश केला होता. आता जूनमध्ये प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेत १०८ गावांचा समावेश केला आहे. राज्यातील एकूण १ हजार ४६१ चौरस किलोमीटर क्षेत्र या अधिसूचनेमुळे जैवसंवेदनशील ठरणार आहे.

सूचना, हरकती मागवणार

मुख्यमंत्र्यांनी याविषयी दिलेल्या आदेशानुसार, या अधिसूचनेच्या प्रती पंचायती आणि आमदारांना पाठवण्यात येतील आणि त्यांच्याकडून या अधिसूचनेवरील हरकती मागविल्या जातील. अधिसूचनेवर राज्य सरकारला आक्षेप घेण्यासाठी जूनपासून ६० दिवसांचा अवधी असल्याने या कालावधीत हे आक्षेप मागवून ते केंद्र सरकारसमोर पुन्हा सादर करण्याची प्रक्रिया राज्य सरकार करणार आहे.

जैवसंवेदनशील विभागातून गावे वगळण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिण्यात येणार आहे. त्यांनीच ठरविलेल्या निकषांच्या आधारे गावे वगळण्याची मागणी आम्ही केली असून ती मान्य होण्याची खात्री आहे.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lavani Marathi Folk Art: शेतातील 'लावण' की सौंदर्याचे 'लावण्य'? मराठी मातीशी जोडलेल्या लावणीची वास्तववादी व्याख्या

Hannah Arendt On Violence: दुष्टता ही राक्षसाकडून नाही तर स्वतंत्र विचार न करणाऱ्या सामान्य माणसाकडून घडते! हॅना आरेन्ट यांचे पथदर्शी विचार

Crime News: "तू तिच्याशी का बोलतोस?" बिअर पार्टीतून सुरू झाला वाद; संतापलेल्या तरुणाने ब्लेडने सपासप वार करत मित्राला संपवलं

Verna: टेम्पोवर कोसळली वीजवाहिनी; छत्तीसगडच्या 30 वर्षीय क्लिनरचा मृत्यू

Shani Vakri 2026: शनिदेवांची उलटी चाल! 'या' राशींना बसणार मोठा आर्थिक फटका; नोकरी-व्यवसायात वाढणार मानसिक ताण

SCROLL FOR NEXT