Goa Bad Road Dainik Gomantak
गोवा

रस्त्यांबाबत वेगळेच राजकारण! 'जेटपॅचर'चा थांगपत्ता नाही; आश्‍वासन हवेत विरली खड्डे मात्र 'तसेच'

Goa Road Condition: काब्राल यांचे मंत्रिपद गेले तरी खड्डे बुजविण्यात यश नाही, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याला माहिती नसावे

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी १ नोव्हेंबर २०२३ पूर्वी राज्यातील सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजविले जातील असा विश्वास जनतेला दिला होता, मात्र वर्ष उलटले तरी खड्डे बुजविण्यात सरकारला यश आले नाही. दरम्यान, काब्राल यांचे मंत्रिपद देखील गेले. जेट पॅचर यंत्राने हे खड्डे बुजविले जाणार असल्याने ते यंत्रही काब्राल यांनी उपलब्ध केले होते. आज त्या यंत्राचा वापर होतो की नाही याबाबत लोकांना संशय आहे.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे स्वतः सार्वजनिक बांधकाम मंत्री असून चतुर्थीपूर्वी राज्यातील सर्व खड्डे बुजतील असे आश्वासन त्यांनी जनतेला दिले होते. मात्र त्यांनी दिलेले आश्वासन सार्वजनिक बांधकाम खात्याला माहिती नसावे असा सूर जनतेतून उमटू लागला आहे. मुख्यमंत्र्यांना जबाबदार धरण्यापेक्षा आज जनता विभागातील कर्मचाऱ्यांना जबाबदार धरू लागली आहे.

आमदार नीलेश काब्राल ज्यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री होते तेव्हा त्यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी जेट पॅचर यंत्र विकत घेतले होते. पावसात खड्डे बुजविणे शक्य होत नसल्याने हे यंत्र खरेदी करण्यात आले होते मात्र आता पावसात या यंत्राचा वापर विभागाने खड्डे बुजविण्यासाठी केल्याचे दिसून आले नाही.

यावर्षीचा गणेश चांगल्या रस्त्यातून आपल्या घरी येणार अशी अपेक्षा भाविकांनी केली होती, मात्र भाविकांच्या अपेक्षेला सरकारची साथ मिळाली नाही. आता तर विभाग कर्मचाऱ्यांना समस्यांचा दोष देण्याचे वेगळेच राजकारण सुरु झाले आहे.

ते यंत्र कुठे आहे?

पावसात रस्त्यांवरील खड्डे बुजविणे शक्य होत नाही आणि डांबरीकरण करून दुरुस्ती करणेही शक्य नसते. त्यामुळे सरकारने सार्वजनिक बांधकाम खात्यातर्फे जेट पॅचर हे अत्याधुनिक यंत्र आणले होते. कॉंक्रिट किंवा डांबर खड्ड्यांमध्ये घालताना ते तयार करण्यापासून ते सुकविण्यापर्यंत सर्व प्रक्रिया हे यंत्र करते. त्यामुळे याचा पावसात अधिक फायदा होतो. परंतु रस्त्यांवरील खड्डे पाहता पावसात याचा लोकांच्या सुरक्षिततेसाठी हवा तेवढा वापर झाला असे दिसून आले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT